स्कूल बसचालकांकडून एक लाखाचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पुणे - विद्यार्थी वाहतुकीतील नियमांचे पालन न केल्यामुळे जप्त केलेल्या 18 स्कूल बस व मारुती व्हॅनचालकांकडून एक लाख 15 हजार रुपयांचा दंड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) वसूल केला आहे.

नियमांचे पालन न करणाऱ्या 132 स्कूल बस व मारुती व्हॅनची मंगळवारी अचानक आरटीओने तपासणी केली. यामध्ये दोषी आढळलेली 60 वाहने आरटीओने ताब्यात घेतली होती. त्यापैकी 18 वाहनचालकांनी तातडीने आरटीओने आकारलेला दंड, कर व व्यवसाय कराचा भरणा केला. यामध्ये दंड स्वरूपात एक लाख पाच हजार रुपयांची वसुली केली, तर कर स्वरूपात चार हजार 600 आणि व्यवसाय कराच्या स्वरूपात पाच हजार 285 रुपयांचा भरणा करून घेण्यात आला आहे.

ज्या वाहनचालकांकडे रोख रक्कम होती, त्यांनी दंडाच्या रकमेचा भरणा करून आपली वाहने सोडवून घेतली आहे; मात्र ज्या वाहनचालकांकडे रोख रक्कम नव्हती, त्यांनी धनादेश, तसेच डीडीद्वारे दंडाची रक्कम भरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दंडाची रक्कम भरल्यानंतर जप्त केलेली वाहने सोडली जातील, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.

25 स्कूल बस जप्त
आरटीओने बुधवारीही विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी मोहीम सुरू ठेवली होती. या मोहिमेंतर्गत 70 स्कूल बसची तपासणी केली. पाच पथकांद्वारे ही तपासणी करण्यात आली. त्यापैकी 25 स्कूल बसवर जप्तीची कारवाई केली आहे.

Web Title: School bus driver fine recovery by rto