शिक्षण विभाग करणार 33 हजार शाळा प्रगत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पुणे - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमामुळे राज्यातील पंधरा हजार शाळा प्रगत झाल्या असून, शिक्षण विभागाने पुढील वर्षात 33 हजार शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यासाठी शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी जलद प्रगत प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार आहे.

शिक्षण खात्याचे प्रधान सचिव नंदकुमार एका कार्यक्रमासाठी पुण्यात आले. त्यांनी ही माहिती "सकाळ'ला दिली. ते म्हणाले, 'राज्यातील जिल्हा परिषद वा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांतील एकही मूल अप्रगत राहू नये, यासाठी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र योजना राबविली. त्याद्वारे मूलभूत चाचण्या घेऊन मुलांना प्रगत करण्याचे उद्दिष्ट शिक्षक पूर्ण करीत होते. ज्ञानरचनावादी आणि आनंददायी शिक्षणासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.''

'राज्यात आता 15 हजार शाळा प्रगत झाल्या. आता पुढील वर्षात 33 हजार शाळा प्रगत करण्याचे उद्दिष्ट आहे. ते जलदगतीने साध्य करता यावे म्हणून राज्यभरातील पाच हजार शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. दीड महिन्यात हा उपक्रम पूर्ण केला जाईल. त्यासाठी अधिकारी स्तरावरील बैठकांमध्ये नियोजन सुरू आहे,'' असेही त्यांनी सांगितले.

Web Title: school develop by education department