पुरंदर : वाढदिवसाच्या दिवशीच शाळकरी मुलीने केली आत्महत्या

पुरंदर : वाढदिवसाच्या दिवशीच शाळकरी मुलीने केली आत्महत्या

खळद : शिवरी (ता.पुरंदर) येथील शिवानी जालिंदर लिंभोरे या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शनिवारी (ता. ६ मार्च रोजी) ही घटना घडली. याबाबत जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मयत नोंद करण्यात आली आहे.

जेजुरी पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार जालिंदर सर्जेराव लिंभोरे (वय 59 वर्ष) रा. शिवरी यांनी खबर दिली. यानुसार ते शेतात काम करून घरी येऊन घराचा दरवाजा उघडून घरात आले असता मयत शिवानी हिने घरात अँगलला साडीने गळफास घेतलेला दिसला.

त्यावेळी त्यांनी भाऊ सोपान लिंभोरे व इतर लोकांचे मदतीने तीस खाली उतरून शिवरी येथील स्थानिक खाजगी डॉक्टर व नंतर जेजुरी येथील सरकारी दवाखान्यात नेले असता तेथील डॉक्टरांनी तपासून मयत झाल्याचे सांगितले आहे.

पुढील तपास जेजुरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सुनील महाडिक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार महादेव कुतवळ हे करीत आहेत.

शिवानी ही येथील महात्मा ज्योतिराव फुले विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती व  शनिवारी तिचा वाढदिवस होता व याच दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

(संपादन : सागर डी. शेलार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com