सीमेवरील जवानांसाठी मुलींनी तयार केल्या राख्या

राजकुमार थोरात 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

वालचंदनगर (ता.इंदापूर) : येथील लोकनेते शहाजीराव पाटील माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यालयातील मुलींनी सीमेवरील लढणाऱ्या जवानांसाठी 790 राख्या तयार केल्या आहेत. राख्या व फौजी भावाला लिहिलेले पत्र आज पाठविण्यात आले. 
येथील विद्यालयातील मुली पुण्यातील सैनिक मित्र परिवाराच्या वतीने सीमेवरती लढणाऱ्या जवानांसाठी दरवर्षी राख्या तयार करीत असतात. चालू वर्षीही शाळेतील मुलींनी स्वत:च्या हाताने 790 राख्या तयार केल्या आहेत. मुली राखीबरोबर फौजी भावाला पत्र ही पाठवत असतात. आज शाळेमध्ये माजी सैनिक नामदेव पडळकर, पांडुरंग हेगडकर व सोमनाथ थोरात यांच्या उपस्थितीमध्ये राख्या व पत्र पाठविण्यात आले. 

यावेळी शाळेचे प्राचार्य दशरथ घोगरे यांनी सीमेवरील फौजी बांधवाना रक्षाबंधन साजरे करता यावे यासाठी शाळेच्या माध्यामातुन दरवर्षी शाळेतील मुलीच घरी राख्या तयार करुन फौजी भावाला पाठवत असल्याचे सांगितले. कार्य्रकमाचे प्रास्ताविक अमोल निलाखे, सुत्रसंचालन राजेंद्र रणमोडे व भिमराव खाडे व आभार शशिकांत गायकवाड यांनी मानले.

मेरे फौजी भाई...

चाँद की तरह चमकते रहो...
फुलो की तरह महकते रहो...
हमारी यह दुवॉ है...आप हमेशा आगे पढते रहो...
 दुश्मनो से लढने के लिए आपके हाथो को हमारी राखी अधिक मजबुत करे...यह हमारी भगवान से प्रार्थना करते है... अशा आशयाची पत्रे मुलींनी फौजी बांधवाना पाठविली आहेत.

Web Title: school girl make rakhi for Soldier