Pune Rains : अतिवृष्टीमुळे शाळा-महाविद्यालयांना शुक्रवारी सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे.

पुणे : अतिवृष्टीमुळे जिल्हा प्रशासनाने पुणे शहर, हवेली, पुरंदर, भोर आणि बारामती तालुक्यातील शाळा- महाविद्यालयांना सलग दुसऱ्या दिवशी शुक्रवारी (ता. 27) सुटी जाहीर केली. याबाबत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी गुरुवारी रात्री आदेश जारी केले.

शहर आणि जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. अतिवृष्टीमुळे शहर आणि जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शुक्रवारी शाळा- महाविद्यालये बंद ठेवावीत, असे परिपत्रक जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात आले आहे.

अतिवृष्टीमुळे आपत्कालीन स्थिती पाहता विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये, यासाठी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे. शैक्षणिक संस्थानी शाळा- महाविद्यालये बंद ठेवावीत. 
- नवल किशोर राम, जिल्हाधिकारी

Image may contain: text

आणखी महत्त्वाच्या बातम्या :

- Pune Rains : पुणेकरांनो, घाबरू नका; प्रशासनाकडून आपातकालीन क्रमांक जारी

- PuneRains: पुण्यात ‘या’ भागात उद्या मिळणार नाही पाणी

- Pune Rains : पुणेकरांनो, जाणून घ्या पावसाचा जोर कधी होणार कमी? (व्हिडिओ)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School holiday declared on Friday due to heavy rain in Pune