पुणे : अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे शाळा कॉलेजला मंगळवारी सुट्टी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये यांना उद्या (मंगळवार, सहा ऑगस्ट) सुटी राहणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.

पुणे : मुठा मुठा नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून पुणे शहरातील वाहतूर विस्कळीत झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने वर्तविलेल्या अतिवृष्टीच्या शक्यतेमुळे पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये यांना उद्या (मंगळवार, सहा ऑगस्ट) सुटी राहणार असल्याची घोषणा जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली.
 

पुण्यातील शाळा व महाविद्यालये आजही (सोमवारी) बंद होती. ती आता सलग दोन दिवस बंद राहतील. वेधशाळेने पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. भोर, वेल्हे, मुळशी, मावळ या तालुक्यांत जोराचा पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नद्यांना पूर आलेला आहे. 
 

 pune

वाहतूकीची कोंडी ठिकठिकाणी होत आहे. या स्थितीत विद्यार्थ्यांना याचा त्रास होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचे जाहीर करण्यात आले आहे. या निर्णयामध्ये प्री प्रायमरी, प्राथमिक, माध्यमिक शाळांसह महाविद्यालयांचाही समावेश करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: School holidays on Tuesday due to heavy rain At Pune