पिंपरी : शहरात प्रथमच खुल्या गटाऐवजी शालेय महापौर चषक क्रीडा स्पर्धा  

PCMC-building.jpg
PCMC-building.jpg

पिंपरी : जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील खुल्या गटातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर चषक क्रीडा स्पर्धा आता बाद झाल्या असून त्याऐवजी आता जानेवारी 2020 मध्ये शहर पातळीवरच 17 क्रीडा प्रकारांमध्ये शालेय 'महापौर चषक' टीन-20 क्रीडा स्पर्धा प्रथमच भरविण्यात येणार आहे. तिच्या नियोजनाबाबत सोमवारी (ता.18) सभा बोलाविण्यात आली आहे.
 
या स्पर्धेच्या नियोजनासाठी महापालिकेतर्फे, संत तुकाराम नगरमधील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये सकाळी 11 वाजता शहर परिसरातील मनपा, खासगी प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक तसेच विविध क्रीडा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची सभा बोलाविण्यात आली आहे. स्पर्धेच्या विजेत्या-उपविजेत्या स्पर्धकांना द्यावयाची पारितोषिके, ऑनलाईन प्रवेशिका, स्पर्धा ठिकाणे, पंच यासह स्पर्धेच्या अनुषंगाने इतर गोष्टींवर चर्चा होणार आहे. 

या स्पर्धेमध्ये मैदानी (ऍथलेटिक्‍स), फुटबॉल, कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, जलतरण, स्केटिंग, हॉकी, कुस्ती, थ्रोबॉल, योगा, क्रिकेट, बास्केटबॉल, हॅन्डबॉल आणि कराटे अशा 17 प्रकारांत विद्यार्थी खेळाडू मैदानात उतरणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com