पुणे: विद्यार्थिनींना अश्लिल व्हिडिओ दाखविणाऱ्या शिपायाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 ऑक्टोबर 2018

संभाजी रघुनाथ चौधरी (वय 47, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे या शिपायाचे नाव आहे. 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली होती. त्यानंतर विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पुणे : कोथरुडमधील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखविणाऱ्या शाळेच्या शिपायास कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबधित शिपायाकडुन काही दिवसांपासून हा प्रकार सुरु होता. त्याबाबत विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर शाळेने पोलिसांकडे तक्रार केली. कोथरूड पोलिसांनी संबंधित शिपायास तत्काळ अटक केली आहे. 

संभाजी रघुनाथ चौधरी (वय 47, रा. शास्त्रीनगर, कोथरूड) असे या शिपायाचे नाव आहे. 3 ते 5 ऑक्टोबर दरम्यान ही घटना घडली होती. त्यानंतर विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

Web Title: school peon arrested for shown sex videos in Pune