शैक्षणिक शुल्क न भरल्याने दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यास शाळेकडून नकार

शुल्क अभावी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार या चिंतेने पालक अस्वस्थ झाले आहे
 10th and standard
10th and standard sakal

रामवाडी: नगररोड भागातील अनेक इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत शैक्षणिक शुल्क न भरल्या मुळे दहावीच्या विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट दिले जात नसल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहेत. शुल्क अभावी आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होणार या चिंतेने पालक अस्वस्थ झाले आहे. शक्य होईल तसे शुल्क भरू असे लेखी अर्ज शाळेमध्ये देण्यात आला. मुलांना परीक्षेला बसू द्यावे अशी मागणी पालकां कडून केली जात आहे.

 10th and standard
Pune City Corona: रुग्णांची संख्या पहिल्यांदा पन्नाशीच्या आत

कोरोना काळात दोन वर्षापासुन शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्ग सुरू होते.शाळेच्या विविध activity घेतल्या गेल्या नाही परंतु शैक्षणिक वार्षिक शुल्क मात्र कमी करण्यात आले नाही त्यामुळे अनेक पालकांचे दोन ते तीन वर्षाचे शुल्क भरू शकले नाहीत.कोरोनाच्या काळात काही पालकांच्या नोकर्‍या गेल्यात तर काहीचे लघु व्यवसाय बंद पडले होते.

कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी अर्थिक परिस्थिती पूर्वव्रत होणाऱ्या वेळ लागत आहे.शाळेचे शुल्क आम्ही नक्की भरू पण मुलांना परीक्षेला बसू द्या अशी कळकळीची विनंती पालकां कडून केली जात आहे.

 10th and standard
Pune Corporation: प्रभाग रचनेत बदल होण्याची शक्यता

वडगाव शेरी नागरिक मंचचे अध्यक्ष आशिष माने यांनी शाळेच्या मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क केला. परीक्षेला बसू न देणे हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कावर गदा आणण्याचा प्रकार असून त्यांची अडवणूक करू नये व परीक्षा देऊ द्यावी अशी मागणी शाळा व्यवस्थापना कडे केली.

शिवाजी झालटे - पालक : कोरोना मुळे माझी अर्थिक परिस्थिती कोलमडली आहे. त्यामुळे

माझ्या मुलांची आठवी ते दहावी पर्यत फी रखडली आहे. दहावीची फर्स्ट टर्म फी भरली आहे. सेकंड टर्म फी आणि आठवी व नववीची सर्व फी भरा त्यानंतर परीक्षेसाठी लागणारे हॉल तिकीट दिले जाईल असे सांगण्यात आले.फादर एस रोझारिओ : अनेक पालकांनी दोन वर्षापासुन शाळेची फी भरली नाही तरीही कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता मुलांना परीक्षेच्या वेळी लागणारे हॉल तिकीट दिले जात आहे.

औदुंबर उकिरडे : उपसंचालक शिक्षण विभाग पुणे : शाळेकडून शैक्षणिक शुल्क बाबत थोडी सवलत पालकांना देण्यात यावी तसेच पालकांनी टप्प्या टप्प्याने आपल्या मुलांचे शैक्षणिक शुल्क भरावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com