शालेय शिष्यवृत्तीचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

पुणे - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत फेब्रुवारी घेतलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल सोमवारी जाहीर झाला. पाचवीतील १६ हजार ५९३ विद्यार्थ्यांना, तर आठवीतील १३ हजार ७५९ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात आला होता. 

इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी राज्यातील सुमारे चार लाख ८८ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर चार लाख ७२ हजार ६१० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील एक लाख आठ हजार ५६० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले, मात्र त्यापैकी २२.९७ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे. इयत्ता आठवीमधील सुमारे तीन लाख ७० हजार २४३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केली होती. एकूण तीन लाख ५८ हजार ८४८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. त्यातील ४५ हजार १०३ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, १२.५७ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती जाहीर झाली आहे. शिष्यवृत्ती परीक्षेचा तात्पुरता निकाल जूनमध्ये जाहीर करण्यात आला होता. 

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल ‘www.mscepune.in’ आणि ‘http://puppss.mscescholarshipexam.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिली.

Web Title: school scholarship result declare