शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट

सुंदरबाई राठी शाळा - विद्यार्थिनींनी शाळेच्या पहिल्या दिवशी काढलेली पुस्तकदिंडी.
सुंदरबाई राठी शाळा - विद्यार्थिनींनी शाळेच्या पहिल्या दिवशी काढलेली पुस्तकदिंडी.

पुणे - गेला दीड महिना सुन्या असणाऱ्या विद्येच्या प्रांगणात मंगळवारी पुन्हा किलबिलाट झाला आणि शाळेचा भोवतालही मुलांशी बोलू लागला. कुठे औक्षण, पुस्तके आणि खाऊवाटप, तर कुठे पुष्पवर्षाव करून ग्रंथदिंडी काढण्यात आली. अत्यंत आनंदमय वातावरणात पहिला दिवस सर्वच शाळांनी उत्साहात साजरा केला. 

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमणबाग, अहल्यादेवी, न्यू इंग्लिश स्कूल, शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आणि अन्य शाळांमध्ये प्रांगण आकर्षक रांगोळ्यांनी सजविण्यात आले. रंगीबेरंगी फुगे लक्ष वेधून घेत होती. छोटा भीम, डोरेमॉन, लिटल कृष्णा, मोगली यांच्या कार्टूनही या सौंदर्यात भर घालत होते. 

विठ्ठलवाडीतील तु. गो. गोसावी शाळेने पाठ्यपुस्तके, गुलाब पुष्प, खाऊवाटप तसेच विद्यार्थ्यांचे औक्षण करण्यात आले. सरस्वती पूजन आणि पालकांचा मेळाही घेण्यात आला. सेवासदन संस्थेच्या सुंदरबाई राठी प्रशालेत पुष्पवर्षाव करून फुगे देऊन विद्यार्थिनींचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थिनींनी पुस्तक दिंडी काढली.

धायरीतील कर्णबधिर मुलांच्या शाळेत चॉकलेट वाटून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. हुजूरपागा शाळेतील विद्यार्थिनींना राष्ट्रध्वज आणि गुलाब पुष्प देण्यात आले. शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टने छत्रपती शिवाजी महराज विद्यानिकेतन प्रशाला वसंतदादा पाटील माध्यमिक निकेतन शाळेत विविध साहित्यिकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

मुलांचे उत्साहात स्वागत
कॅंटोन्मेंट बोर्डाच्या महर्षी अण्णासाहेब शिंदे शाळेत विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तके आणि खाऊ देऊन स्वागत करण्यात आले. त्यांच्या स्वागतासाठी फुगे, कार्टून कॅरेक्‍टर आणि फुलांनी शाळा सजवली होती.

या वेळी मुख्याध्यापिका अर्चना कारेकर, नगरसेवक अतुल गायकवाड, शैला चौधरी, परवीन शेख, नलिनी महांबळेश्वरकर, जितेंद्र शिंदे आणि संजय जाधव उपस्थित होते. गायकवाड म्हणाले, ‘‘देशाची प्रगती शिक्षणावर अवलंबून आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे.

मराठी शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींनी अधिक लक्ष द्यायला पाहिजे.’’ कारेकर म्हणाल्या, ‘‘शाळेत इंग्रजी माध्यमाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. संगणक, व्हिडिओ प्रोजेक्‍टर, ध्वनियंत्रणा आणि शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी गायकवाड यांचे सहकार्य लाभले.’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com