शाळेच्या घंटेविना ऑनलाइन वर्ग होणार सुरू

कोरोनाच्या महामारीमुळे शहरातील लाखो विद्यार्थ्यांचे सलग दुसरे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ हे ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहे.
Online School
Online SchoolSakal

पुणे - कोरोनाच्या (Corona) महामारीमुळे शहरातील लाखो विद्यार्थ्यांचे (Student) सलग दुसरे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ हे ऑनलाइन पद्धतीने (Online Process) सुरू होणार आहे. मंगळवारपासून (ता. १५) शाळा सुरू होणार असून यंदाही विद्यार्थी शाळेत (School) येणार नाहीत, शाळेच्या घंटेविना ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. (School Start Online Class Today)

शाळा सुरू होणार म्हटलं की शैक्षणिक साहित्य, दप्तर, पाठ्यपुस्तके खरेदीची लगबग, पहिल्या दिवशी मुलांच्या स्वागताची तयारी, असा उत्साही वातावरण असते. परंतु सलग दुसऱ्या वर्षी शहरातील शाळा मंगळवार ऑनलाइन पद्धतीने सुरू होणार आहेत. मात्र गेल्यावर्षी शाळा टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचे मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या होत्या. यावर्षी सोमवारी उशिरापर्यंत कोणत्याही प्रकारे मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे बहुतेक शाळांनी गेल्यावर्षीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेचे मुख्याध्यापक दिलीप रावडे म्हणाले,‘‘पहिल्या टप्प्यात आम्ही नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करत आहोत. त्यानंतर सहावी ते आठवीचे वर्ग सुरू करण्यात येतील. दररोज नववी आणि दहावीचे तीन तास, तर सहावी ते आठवीची दोन तास अशा ऑनलाइन तासिकांचे नियोजन केले आहे. दररोजचे विषयानुसार वेळापत्रक बनविले असून ते विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.’’ शाळेत नव्याने प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन स्वागत समारंभ आयोजन असल्याचेही रावडे यांनी सांगितले.

Online School
कोरोनामुळे 33 हजार मुले मूळ शाळेला मुकणार

पाठ्यपुस्तकाविना भरणार शाळा

दरवर्षी शाळेच्या पहिल्या दिवशी नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना दिली जातात. मात्र, ‘समग्र शिक्षा अभियान’ या अंतर्गत यंदा पुरेशा प्रमाणात पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याने मुलांचे ऑनलाइन वर्ग पाठ्यपुस्तकाविना सुरू होणार आहेत. अनेक शाळांपर्यत अद्याप पाठ्यपुस्तके पोचलेली नाहीत. खराडी येथील सुंदरबाई मराठे विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी म्हणाले,‘‘ समग्र शिक्षा अभियानातंर्गत दिली जाणारी पाठ्यपुस्तके अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. त्यामुळे पाठ्यपुस्तकाविना शाळा सुरू करावी लागणार आहे. जुन्या पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांकडून मागवून घेऊन यंदा ऑनलाइन वर्ग सुरू होणार आहेत. तसेच शाळा सुरू करताना किती तास शिकवायचे, मागील इयत्तेची उजळणी घेण्यासाठी असणारा ‘ब्रीज कोर्स’ याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना अद्याप मिळालेल्या नाहीत.’’

दुकानांमध्ये पाठ्यपुस्तकांचा तुटवडा

पुस्तकांच्या बाजारपेठेत पाठ्यपुस्तके उपलब्ध असली, तरी पहिली ते बारावीची सर्वच पाठ्यपुस्तके उपलब्ध आहेत, असे नाही. काही इयत्तांच्या पाठ्यपुस्तके बाजारात उपलब्ध नसल्याने पालक आणि विद्यार्थ्यांची निराशा होत आहे.

‘ऑनलाइन’द्वारेही होणार विद्यार्थ्यांचा स्वागतोत्सव

‘शाळा ऑनलाइनद्वारे सुरू होणार असली, तरी हा दिवस नावीन्यपूर्ण पद्धतीने साजरा होणार आहे. ऑनलाइन वर्गाचा प्रारंभ शारदा स्तवन, घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन होईल. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी पपेट शो, गाणी, गोष्टी याचे नियोजन शिक्षकांनी केले आहे. शिक्षक आणि विद्यार्थी याची प्रत्यक्ष भेट होणार नसली, तरी आपुलकी वाटावी म्हणून पहिला दिवस उत्साहात साजरा होणार आहे.’

- माधुरी बर्वे, मुख्याध्यापिका, डीईएस प्री प्रायमरी स्कूल (टिळक रोड)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com