तोरण, ओवाळणीने विद्यार्थ्यांचे स्वागत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 जून 2018

कोथरूड - दाराला तोरण लावून बालगोपाळांना ओवाळीत पुष्पगुच्छ आणि खाऊचे वाटप करीत कोथरूड भागातील शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. कोथरूडमधील पुणे महापालिकेचे छत्रपती संभाजी महाराज विद्यालय आणि मीनाताई ठाकरे विद्यानिकेतन शाळेत स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

‘सकाळ माध्यम समूह’च्या वतीने विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी दिनेश माथवड, नवनाथ जाधव, राजश्री सावंत, ‘सकाळ’चे वितरण विभागाचे सहायक व्यवस्थापक संतोष कुडले, अर्जुन देवकर, अंजली कुलकर्णी, श्रीमंत राऊत, वैशाली दोरगे, अनंता हरपुडे आणि विद्यानिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका सरोज जगताप आदी उपस्थित होते.    
सविता महाजन यांनी सूत्रसंचालन केले, तर अर्जुन देवकर यांनी आभार मानले.

महापालिकेच्या शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि शिक्षण सुविधा मिळण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. या विद्यार्थ्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण होऊ नये असे वातावरण महापालिका शाळांमध्ये तयार करण्यात येत आहे. इमारत दुरुस्ती, नूतनीकरण, शालेय सुविधांसाठी दरवर्षी निधी देण्यात येत आहे. ध्येय निश्‍चित करून अभ्यास केल्यास चांगले यश मिळविता येते हे विद्यार्थ्यांनी लक्षात घेतले पाहिजे.  
- मुरलीधर मोहोळ

Web Title: school start student welcome