‘त्या’ शाळेचे विद्यार्थीच शिक्षक    

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 ऑगस्ट 2018

घोरपडी - गावातील डोबारवाडी परिसरातील (कै.) अनंतराव व्यंकटेशराव मुदलियार शाळेत शिक्षकांच्या कमतरतेमुळे मुलेच एकमेकांचे धडे घेत आहेत. बालवाडी ते सातवीपर्यंतची शाळा असूनही फक्त दोन शिक्षक येथे ज्ञानदान करतात. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

या शाळेतील दोन शिक्षकांची शाळा भरण्यापूर्वीच बदली झाली, तर दोन शिक्षकांची शाळा भरल्यावर बदली झाली. तसेच सध्या एका शिक्षिकेची बदली झाली आहे; मात्र तिला शाळेतून सोडण्यात आलेले नाही. याबाबत नाव न सांगायच्या अटीवर एका व्यक्तीने सांगितले, की शिक्षण मंडळाकडे याबाबत वारंवार तक्रार करून ही शिक्षकांची भरती होत नाही.

या शाळेत गरीब, मजूर आणि परप्रांतीय व स्थलांतरित नागरिकांची मुले शिक्षणासाठी येतात. शाळेत सध्या १७० विद्यार्थी असून नवीन प्रवेश सुरू आहेत. शिक्षक उपलब्ध नसल्यामुळे या मुलांना शिकवणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पुरेसे शिक्षक नसल्यामुळे अनेक वेळा शाळेतील रखवालदार किंवा तेथे काम करणारी मावशी या विद्यार्थ्यांचा सांभाळ करत आहे. तसेच शिक्षक गैरहजर असल्याने वर्गातील हुशार विद्यार्थी मुलांचे धडे घेत आहेत. या शाळेतील मुले हिंदी भाषक आहेत; मात्र त्यांची शिकवणी मराठीतून असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. 

एके काळी या शाळेत ६००-७०० विद्यार्थी असायचे. दोन सत्रात भरणाऱ्या शाळेत एका इयत्तेच्या दोन-तीन तुकड्या होत्या. चांगल्या शाळेच्या नावांमध्ये या शाळेचे नाव होते; मात्र मागील काही वर्षांत मराठी शाळेची पटसंख्या कमी होत गेली आणि शिक्षकांची संख्याही घटली. शाळेत सेमी इंग्रजी सुरू करावे. 
-केदार कवडे, माजी विद्यार्थी 

शाळेला पाच शिक्षकांची गरज असून, तीन शिक्षक शाळेत उपलब्ध आहेत, इतर दोन लवकरच रुजू होतील.
-शिवाजी दौंडकर,   प्रभारी शिक्षण प्रमुख, पालिका

Web Title: School students are teachers