जुनी सांगवीत चिमुकल्यांनी लुटला दहीहंडीचा आनंद

School Students Celebrate Dahihandi at juni sangavi
School Students Celebrate Dahihandi at juni sangavi

जुनी सांगवी - रंगीबेरंगी पोषाखात नटलेले राधा-कृष्णाच्या वेशातील चिमुकले... विविधरंगी फुलांनी सजवलेली दहीहंडी... विविध मराठी गाण्यांचा गजर... हंडी फुटल्यावर केलेला एकच जल्लोष... अशा उत्साही वातावरणात जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश/मराठी मिडीयम स्कुल आणि भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात मुलांनी दहीहंडीचा आनंद लुटला. गोविंदा आला रे... आला... यासारख्या गाण्यावर नृत्य करत ते दहीहंडी उत्सवात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात चिमुकल्यांसह शिक्षकही उत्साहाने सहभागी झाले होते.

यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे-पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना आपल्या सण उत्सवांची माहिती व्हावी, तसेच सण-उत्सवांचा आनंद लुटता यावा, याकरीता दहीहंडी उत्सव आयोजित केला होता.

शाळेच्या आवारातील दहीहंडी सर्वांचं लक्ष वेधून घेत होती. शिक्षकांनी विद्यार्थ्याना कृष्ण जन्माष्टमी व गोपालकाला यांचे महत्व सांगितले. गणेशोत्सावात पर्यावरणपूरक वस्तूचा वापर वाढवा, पाणी वाचवा, जलसंवर्धन याविषयी जनजागृती करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यानी स्वच्छतेचा संदेश देवून परिसर स्वच्छतेबाबत जनजागृती केली. 

या उपक्रमाबाबत आरती राव म्हणाल्या, दरवर्षी शाळेमध्ये हा उत्सव साजरा केला जातो. दहीहंडी हा संपूर्ण देशातील लोकप्रिय आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारा सण आहे. याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, हा आयोजना मागे हेतू असतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com