शाळेतील चार भिंतींतून बाहेर पडा - सुबोध भावे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 जुलै 2018

पुणे - ‘शाळेतील चार भिंतींतून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकरूप व्हायला हवे आणि निसर्ग समजून घ्यायला हवा,’’ असे आवाहन अभिनेते सुबोध भावे यांनी विद्यार्थ्यांना केले. 

पुणे - ‘शाळेतील चार भिंतींतून बाहेर पडून विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकरूप व्हायला हवे आणि निसर्ग समजून घ्यायला हवा,’’ असे आवाहन अभिनेते सुबोध भावे यांनी विद्यार्थ्यांना केले. 

नूतन मराठी विद्यालय (मुलांची) आणि ॲड-व्हेंचर फाउंडेशनतर्फे मारुती चितमपल्ली आंतरशालेय पर्यावरण जागृती प्रकल्पांतर्गत सुरू केलेल्या ‘ॲड-व्हेंचर कट्ट्या’चे उद्‌घाटन भावे आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांच्या हस्ते झाले, त्या वेळी भावे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मृण्मयी यांनी विद्यार्थ्यांना माणूसपण जपण्यासाठी घराबाहेर पडून निसर्गात भटकंती करण्याचे आवाहन केले. महापालिकेचे शिक्षणाधिकारी डॉ. दीपक माळी, जलतरणपटू रोहन मोरे, गिर्यारोहक चेतन केतकर, फाउंडेशनचे विवेक देशपांडे, मुख्याध्यापिका संजीवनी ओमासे, उपमुख्याध्यापिका सरिता गोखले आणि पर्यवेक्षक भरत सुरसे उपस्थित होते. या कट्ट्याद्वारे विद्यार्थ्यांना साहस, वन्यजीवन, वनस्पती आणि कीटकांचे विश्‍व यासह गडकिल्ले आणि निसर्गात भटकंती अशा गोष्टींशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. २५ शाळांमध्ये हा प्रकल्प राबविणार आहे. नूतन मराठी विद्यालयात कट्ट्याचे मुख्य केंद्र असेल.

Web Title: School Subodh Bhave student