esakal | पुण्यातील शाळा सुरूच; पण हजेरीवर परिणाम | Student
sakal

बोलून बातमी शोधा

School
पुण्यातील शाळा सुरूच; पण हजेरीवर परिणाम

पुण्यातील शाळा सुरूच; पण हजेरीवर परिणाम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - शाळा बंद करण्याबाबत कोणताही अधिकृत आदेश नसल्यामुळे, जवळपास सर्वच शाळा सोमवारी नियमितपणे सुरू होत्या. दरम्यान, ‘महाराष्ट्र बंद’ याबाबत पालकांच्या मनात धास्ती असल्यामुळे त्याचा परिणाम मुलांच्या हजेरीवर दिसला. नियमित हजेरीच्या तुलनेत सोमवारी विद्यार्थ्यांची उपस्थिती जवळपास पाच ते दहा टक्क्यांनी घटल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा: महापालिकेचा अर्थसंकल्प वाचा सोप्या पद्धतीने

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे घडलेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या सरकारने सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली. परंतु, यावेळी शाळा बंद ठेवण्याबाबत शालेय शिक्षण विभाग, पुणे जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग यांच्याकडून कोणत्याही प्रकारे अधिकृत सूचना शाळांना दिल्या नाहीत.

‘‘पुण्यातील जवळपास सर्वच शाळा सोमवारी नियमितपणे सुरू होत्या. परंतु, ‘महाराष्ट्र बंद’च्या भीतीने पालकांनी मुलांना पाठविले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची शाळांमधील हजेरी गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पाच ते दहा टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून आले.’’, असे निरीक्षण पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र गायकवाड यांनी नोंदविले.

loading image
go to top