मुळशी, भोर ,वेल्हा अन् मावळ तालुक्यातील शाळांना बुधवारीही सुटी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

आपत्कालीन आणि पूर स्थिती कायम असल्यामुळे बुधवार( ता.7) पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुटी जाहीर केली आहे.

पुणे :  आपत्कालीन आणि पूर स्थिती कायम असल्यामुळे बुधवार( ता.7) पुणे जिल्ह्यातील मावळ, भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक व महाविद्यालयांना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुटी जाहीर केली आहे.

जिल्ह्यातील या चार तालुक्यांमध्ये तीन ऑगस्ट पासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेतल्याचे जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले. 
 

दरम्यान, पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमधील महापालिका आणि खाजगी शाळा  उद्या सुरु राहणार आहेत.

School
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in Mulshi, Bhor, Velha and Maval taluka have holidays on Wednesday