स्कूलिपिंक्‍स स्पर्धेचा धडाका आजपासून 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 नोव्हेंबर 2016

पुणे - शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना मैदानावरील कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या "सकाळ माध्यम समूहा'ने आयोजित केलेल्या "स्कूलिपिंक्‍स 2016' स्पर्धा सोमवारपासून (ता. 7) सुरू होत आहे. पुणे जिल्ह्यातील सुमारे 413 शाळांमधील तीस हजारांहून अधिक विद्यार्थी 2231 पदकांसाठी पुढील महिनाभर आपले कौशल्य पणाला लावतील. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कबड्डी, बॉक्‍सिंग, फुटबॉल, क्रिकेट या खेळांचे सामने होतील. 

रविवारी सकाळी 8.30 वाजता नेहरू स्टेडियमजवळील पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या मैदानात होईल स्पर्धांचे उद्‌घाटन होईल. एकूण 21 खेळांच्या 402 क्रीडा प्रकारांत ही स्पर्धा रंगणार आहे. 

शाळा, विद्यार्थी आणि पालकांना जोडणाऱ्या या स्पर्धेचे यंदा दुसरे पर्व असून, या वेळी सुवर्ण, रौप्य, ब्रॉंझ पदकांसह प्रत्येक पदकाला गुण दिले जाणार आहेत. सर्वाधिक गुण मिळवणारी प्रशाला विजेती असेल. त्याचबरोबर सर्वोत्कृष्ट खेळाडू मुलगा आणि मुलगी अशी वैयक्तिक पारितोषिके ही दिली जाणार आहेत. 

शाळेचे पहिले सत्र संपल्यावर संमेलनाच्या तयारीतच ही स्पर्धा होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळीच ईर्षा निर्माण झाली आहे. संमेलनाच्या जल्लोषात यामुळे भरच पडणार आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी मुलांनी दिवाळीची सुटी खर्ची घातली आहे. त्यामुळे आपल्या मेहनतीला यश मिळावे, या जिद्दीनेच सर्व विद्यार्थी सहभागी होत आहेत. 

शालेय स्तरावर ही स्पर्धा होत असली तरी यातून उद्याचे ऑलिंपियन घडावेत हेच उद्दिष्ट बाळगून सकाळ माध्यम समूहाने हा स्कूलिपिंक्‍स स्पर्धेचा उपक्रम हाती घेतला आहे. सहभागी खेळाडूंपैकी काही यापूर्वीच खेळात आपली ओळख बनवून आहेत. त्यांच्या बरोबरीने मैदानावर या स्पर्धेच्या निमित्ताने प्रथमच पाऊल ठेवणाऱ्यांसाठीदेखील ही स्पर्धा महत्त्व राखून असेल यात शंकाच नाही.

Web Title: schoolympics today start