बालवैज्ञानिकांनी घडविली विज्ञान सफर

Science-Exhibition
Science-Exhibition

सिंहगड रस्ता - बालवैज्ञानिकांनी सुमारे पाच हजार पालकांना विज्ञान जगताची सफर घडविली. निमित्त होते ‘सकाळ’ आणि ‘सन्डे सायन्स स्कूल’ आयोजित विज्ञान प्रकल्प प्रदर्शनाचे.

सन्डे सायन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रकल्पांचे प्रदर्शन वडगाव येथील अभिरूची मॉलमध्ये आयोजित करण्यात आले होते. त्याचे उद्‌घाटन अभिरूची मॉलचे संचालक यशोधन भिडे यांच्या हस्ते झाले. या वेळी सकाळ सन्डे सायन्स स्कूलचे सुयश डाके, दिनेश निसंग आदी उपस्थित होते. 

या प्रदर्शनात स्वयंपाकघरातील विज्ञान, विद्युत प्रवाह, जलतरंग, सौरऊर्जा, मायक्रोस्कोप, हवामान, प्रकाश, आवाज, बल, दाब, ऊर्जा, खगोलविज्ञान, भूमिती, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, इलेक्‍ट्रिकल, हवा, हवेचा दाब, मानवी शरीरशास्त्र, वनस्पतीशास्त्र, न्यूटनचा नियम, विज्ञानातील विविध संकल्पना व गमती-जमती आदी बाबींची माहिती देणारे प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले. यात चारशेहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन दोनशेहून अधिक प्रकल्प सादर केले. पाच हजारांहून अधिक पालकांनी पाल्यांसह प्रदर्शनास भेट दिली.

दर रविवारी दोन तास विज्ञानाचे वर्ग
इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ’ आणि सन्डे सायन्स स्कूलच्या वतीने दर रविवारी दोन तास विज्ञान विषयाचे वर्ग चालविले जातात. यात प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जाते. सकाळ कार्यालय (बुधवार पेठ), कोथरूड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता या भागात हे वर्ग चालविले जातात. पुढील वर्षासाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. माहितीसाठी ९८५००४७९३३, ९३७३०३५३६९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

मी चौथीचा विद्यार्थी आहे. ‘सकाळ’ आणि सन्डे सायन्स स्कूलमुळे आम्हाला विविध प्रयोग करायला मिळाले. या कार्यशाळेचा आम्हाला कधीच कंटाळा येत नाही. 
- अधिराज काकडे, विद्यार्थी

मी आठवीत शिकतो. प्रदर्शनात ‘इको फेन्ड्रली सिटी’ हा प्रकल्प सादर केला. हे सादरीकरण करताना मला खूप मजा आली. यातून मिळालेला अनुभव भविष्यात मला नक्कीच उपयोगी ठरणार आहे.
- स्वप्नील मोटकर, विद्यार्थी

‘सकाळ’ आणि सन्डे सायन्स स्कूलच्या वतीने आयोजित दर रविवारच्या उपक्रमात माझा मुलगा चांगला रमला. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. यात मुलांना आनंद लुटत अभ्यास करणे आणि त्यातून स्वनवनिर्मिती करण्याचा अनुभव घेता येतो. 
- संदीप हिजवणकर, पालक

यामुळे मुलांचा विज्ञानाचा पाया पक्का होतो. या उपक्रमात विद्यार्थ्यांना वयानुरूप प्रकल्प करण्यास मिळतात. त्यांच्यावर कोणताही प्रकल्प लादला जात नाही. त्यामुळे याचा आनंद खूपच वेगळा आहे. 
- मनोज मारणे, पालक 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com