भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमीमध्ये विज्ञान प्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 डिसेंबर 2018

वालचंदनगर - वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमी शाळेमध्ये आयोजित केलेल्या विज्ञान, हस्तकला, चित्रकला प्रदर्शन नुकतेच झाले. यात शाळेतील ४३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

वालचंदनगर - वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील भारत चिल्ड्रन्स ॲकॅडमी शाळेमध्ये आयोजित केलेल्या विज्ञान, हस्तकला, चित्रकला प्रदर्शन नुकतेच झाले. यात शाळेतील ४३० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

प्रदर्शनामध्ये मुलांनी वैज्ञानिक संकल्पना वापरून स्मार्ट डस्टबिन, सेंद्रिय शेती अशा विविध विषयांवर प्रकल्प सादर केले. चित्रकलेच्या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारच्या चित्रांचा समावेश होता. हस्तकला प्रदर्शनामध्ये मुलांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकावू वस्तू तयार केल्या होत्या. तसेच प्लॉस्टिकबंदीला कापडी पिशवीच्या पर्यायासाठी घरातील खराब झालेल्या कपड्यांपासून टिकावू कापडी पिशव्या तयार करण्यात आल्या. दररोजच्या वापराच्या वस्तूंना संस्कृतमध्ये काय म्हणतात. याची माहिती होण्यासाठी संस्कृत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. 

प्रदर्शनाचे उद्‌घाटन पंचायत समितीचे शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी राजकुमार बामणे व वालचंदनगर कंपनीच्या मनुष्यबळ विभागाच्या उपाध्यक्ष सुतापा अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बामणे म्हणाले, विद्यार्थ्यांनी विद्यार्थी दशेमध्ये आरोग्य व अभ्यासाला महत्त्व द्यावे. नियमित व्यायाम करावा.  या प्रसंगी केंद्रप्रमुख बाळासाहेब आडके, प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश सराफ व आभार शमसुद्दीन तांबोळी यांनी मानले.

Web Title: Science Exhibition in Bharat Children Academy