आयसरमध्ये शनिवारी विज्ञान प्रदर्शन

Iiser
Iiser

पुणे - सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ एनआयई (न्यूजपेपर इन एज्युकेशन) व श्रीमती इंद्राणी बालन सायन्स ॲक्‍टिव्हिटी सेंटर आयसर, पुणे यांच्या वतीने खास बालदिनानिमित्त शनिवारी (ता. १६) सकाळी ११ ते ५ या वेळेत विज्ञान प्रदर्शन आयोजित केले आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, शंभरपेक्षा अधिक शाळांचा सहभाग या प्रदर्शनात करण्यात आला आहे. 

शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याच्या संधीबरोबरच विज्ञान प्रयोगांचे सादरीकरण, वैज्ञानिक फिल्म्स, आयसरमधील करिअरच्या संधी, यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

प्रकाश व विद्युत चुंबकत्वाचे मूलभूत नियम, हवेच्या दाबाचे प्रयोग, रॉकेट लाँचर, चांद्रयान मोहिमेची प्रतिकृती, पीएसएलव्हीची प्रतिकृती व त्याचे कार्य, मिनी सोलर टेस्टर, स्मार्ट वॉटर वितरण सिस्टिम, शेतीकामाला मदत करणारा ड्रोन, नैसर्गिक तेलबियांचा वापर करून इंधननिर्मिती, सोपी टेस्ला कॉईल, नैसर्गिक आपत्ती वर्तविणारे स्मार्ट आपत्तीदर्शक, वर्गामधील डस्टलेस डस्टर, कचरा जमा करणारे यंत्र, विविध प्रकारचे रोबोट, ग्रॅव्हिटी लॅम्प्स, वॉटर प्युरिफायर, ध्वनिदर्शक, प्रदूषणमुक्त वाहन, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र यांचे प्रयोग, बॅटरीवर चालणारी मोटार, खाऱ्या पाण्यावर चालणार पंखा, असे प्रयोग प्रदर्शनात ठेवले जाणार आहेत.

अधिकाधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com