...अन्‌ प्रयोगांतून उलगडले विज्ञान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 डिसेंबर 2016

पुणे - सौरऊर्जा कशी तयार होते, त्याचा वापर कसा होतो आणि सौर पॅनेलमधून एक इमारत कशी उजळते असे वैविध्यपूर्ण प्रयोग विद्यार्थी उत्कंठेने जाणून घेत होते. छोट्या- छोट्या प्रयोगांमधून विज्ञान अन्‌ विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्वही जाणून घेत होते. 

पुणे - सौरऊर्जा कशी तयार होते, त्याचा वापर कसा होतो आणि सौर पॅनेलमधून एक इमारत कशी उजळते असे वैविध्यपूर्ण प्रयोग विद्यार्थी उत्कंठेने जाणून घेत होते. छोट्या- छोट्या प्रयोगांमधून विज्ञान अन्‌ विज्ञानाचे दैनंदिन जीवनातील महत्त्वही जाणून घेत होते. 

अमेरिका, इटली आणि ग्रेट ब्रिटनमधील विविध विद्यापीठांतून विज्ञानाचे शिक्षण घेणाऱ्या देशी युवकांच्या या विज्ञानयात्रेची सफर विद्यार्थ्यांनी मनसोक्त अनुभवली. निमित्त होते ‘इट्‌स अ मटेरिॲलिस्टिक वर्ल्ड’ या कार्यशाळेचे. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाचे सायन्स असोसिएशन आणि ‘व्हीजन इंडिया - जनरेशन वाय अप्लाईड सायन्स नेटवर्क (विज्ञानशाला)’ यांनी आयोजिलेल्या या कार्यशाळेचे उद्‌घाटन प्राचार्य डॉ. दिलीप शेठ यांच्या हस्ते झाले.

विज्ञान शाखेचे प्राचार्य डॉ. अनिल दुसाने, डॉ. वंदना अरबाळे आणि डॉ. दिनेश गरुड उपस्थित होते. विज्ञानशालेच्या डॉ. आदित्य सदनाला, दर्शना जोशी, श्रुती शर्मा, विजय वेणुगोपालन यांनी ही कार्यशाळा घेतली.
अकरावी, बारावी आणि विज्ञान शाखेच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात शिकणाऱ्या भारतीय तरुणांनी ही कार्यशाळा घेतली. त्यांनी २४ वैज्ञानिक प्रयोग सादर केले. 

डॉ. आदित्य आणि दर्शना हे ग्रेट ब्रिटनमधील केंब्रिज विद्यापीठातील असून, त्यांनी दोन वर्षांपूर्वी ‘विज्ञानशाला’ ही संस्था स्थापन केली. त्याअंतर्गत ते भारतात विज्ञानाच्या प्रचारासाठी ही कार्यशाळा घेत आहेत. त्यांच्या ग्रुपमधील काहीजण अमेरिकेतील स्टोनीब्रुक विद्यापीठासह इटलीतील इटालियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी आणि पॉलिटेक्‍निको दी मिलानो विद्यापीठात शिकत आहेत. 

डॉ. आदित्य म्हणाले, ‘‘केंब्रिज विद्यापीठात अशा कार्यशाळा नेहमी होतात. अशाच कार्यशाळा भारतात व्हाव्यात आणि भारतीय विद्यार्थ्यांनी विज्ञानात संशोधन करावे, या उद्देशाने आम्ही ही कार्यशाळा देशभर घेणार आहोत.’’

Web Title: science experiment