प्रयोगातून करा विज्ञानाची तयारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन

पुणे - दहावीचं काऊटडाऊन लवकरच सुरू होईल. विज्ञानासारखा विषय नुसता घोकंपट्टी करून लक्षात ठेवता येत नाही. दहावीच्या विज्ञानाच्या विविध संकल्पना स्वत: प्रयोग करून समजून घेता याव्यात, यासाठी प्रात्यक्षिक विज्ञान शिक्षणासाठी कार्यरत असणारे ‘संडे सायन्स स्कूल’ व ‘सकाळ वृत्तपत्र समूह’ यांच्या वतीने उन्हाळ्याच्या सुटीत सहादिवसीय  विज्ञान कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सीबीएसई आणि एसएससी अभ्यासक्रमाचे नववी व दहावीचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.  

या सहादिवसीय कार्यशाळेत दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित विज्ञानातील विविध संकल्पनाची ओळख होऊन उपस्थित विद्यार्थी त्यावर आधारित प्रयोग अथवा वर्किंग मॉडेल स्वत: हाताने बनवतील. ‘मी केलं मला समजलं’ या उक्तीनुसार समजून घेतलेल्या संकल्पना वेगळ्या लक्षात ठेवण्याची गरजच राहत नाही, असे अनेक तज्ज्ञांचे निरीक्षण आहे. २३ ते २८ मे दरम्यान दररोज ३ तास या वेळेत चालणाऱ्या कार्यशाळेत ऑप्टिक्‍समधील विविध प्रयोग प्रीझम, भिंग व आरसे यांच्या मदतीने करतील, डोळा व फुफ्फुसाचे वर्किंग मॉडेल तयार करून जीवशास्रातील संकल्पना कार्डद्वारे समजून घेतील, मग्नेटिसम व इलेक्‍ट्रो-मग्नेटिसममधील संकल्पना वर्किंग मोटार, जनरेटर आदी मॉडेल बनविणे, रसायनशास्त्रातील विविध अभिक्रिया असे सुमारे ६० हून अधिक प्रयोग/ प्रकल्प विद्यार्थी स्वतंत्रपणे करतील. 

या सर्व प्रयोगांचे साहित्य विद्यार्थ्यांना घरीच दिले जाणार आहे, ज्याद्वारे ते सर्व प्रयोग पुन्हा पुन्हा करू शकतील.  या ६ दिवसीय कार्यशाळेचे साहित्यासाहित शुल्क ६००० असून, या कार्यशाळा पुण्यात कोथरूड, सातारा रोड, सिंहगड रोड, हडपसर, चिंचवड आदी ठिकाणी भरणार आहेत. मराठी व इंग्रजी माध्यमाची नववी व दहावीचे विद्यार्थी यात सहभागी होऊ शकतात.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : 
९८५००४७९३३ / ९३७३०३५३६९ / ९०११६३८२८२
दहावी प्रयोग साहित्यासह शुल्क  :  ३००० /-

Web Title: science preparation in experiment