जेजुरीत भंगाराच्या दुकानाला भीषण आग, जीवितहानी नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

परिसरात घरे असल्याने तिकडे आग लागण्याची शक्यता लक्षात घेता धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.

जेजुरी : जेजुरीतील लवथळेश्वर परिसरातील इक्बाल खान यांच्या भंगार मालाच्या दुकानाला आज (गुरुवार) दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. मात्र दुकानात प्लॅस्टिक, ऑईलचे रिकामे बॅरल आणि लाकडी सामान जळून खाक झाले. आगीत मोठे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

आग विझिण्यासाठी जेजुरी नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन गाडया चार तास प्रयत्न करीत होत्या. परिसरात घरे असल्याने तिकडे आग लागण्याची शक्यता लक्षात घेता धोकादायक परिस्थिती निर्माण झाली होती.

या परिसरातील स्थानिक नागरिक, पोलिस, अग्निशामक दलाच्या जवानांनी मोठे धाडस दाखवून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. 

Web Title: scrap garage caught fire at jejuri