रद्दी खातेय भाव!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 ऑगस्ट 2018

पुणे - कागद तयार करण्यासाठी, रद्दीचा वापर करण्यासाठी चीनने घातलेली बंदी व प्लॅस्टिक बंदी या कारणांमुळे रद्दीच्या भावांत वाढ होऊ लागली आहे. प्रति किलोचा भाव १३ रुपयांपर्यंत पोचला आहे. 

पुणे - कागद तयार करण्यासाठी, रद्दीचा वापर करण्यासाठी चीनने घातलेली बंदी व प्लॅस्टिक बंदी या कारणांमुळे रद्दीच्या भावांत वाढ होऊ लागली आहे. प्रति किलोचा भाव १३ रुपयांपर्यंत पोचला आहे. 

कागद तयार करण्यासाठी रद्दीवर  प्रक्रिया करून (रिसायकल) कागद तयार केला जातो. चीनमध्ये रद्दीचे रिसायकल करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तेथून कागदासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या मागणीत वाढ झाली आहे. इंडोनेशिया, मलेशिया आदी देशांतून तेथे कच्चा माल, तयार कागद पाठविला जात आहे. भारतातूनही चीनमध्ये तयार कागद निर्यात केला जाऊ लागला आहे. याचा परिणाम देशातील स्थानिक बाजारांवर पडला आहे. रद्दीची मागणी वाढू लागल्याने भावात वाढ होऊ लागली आहे. मे महिन्यापासून हा परिणाम दिसून येत आहे. शहरात ९ रुपयांपासून ते १३ रुपयांपर्यंत रद्दी खरेदी केली जात आहे. रिसायकल केल्यानंतर पूर्वी तयार कागदाचा प्रति किलोचा भाव ३८ ते ४० रुपये इतका होता. तो आता वाढला आहे. पुण्यात प्रति दिन ७० ते ८० टन रद्दी जमा होते, ही सर्व रद्दी रिसायकलींगसाठी वापरली जाते. याविषयी पुण्यातील कागदाचे व्यापारी विजय भंडारी म्हणाले, ‘‘मागणी वाढल्याने कच्च्या मालाच्या भावांत वाढ झाली. चीनमध्ये रद्दी रिसायकल करण्यास घातलेल्या बंदीचा मोठा परिणाम झाला आहे.’’

 रद्दी खरेदीचा प्रति किलोचा भाव १३ रुपये
 पुण्यात प्रति दिन ७० ते ८० टन रद्दी जमा   
 त्यावर प्रक्रिया करून होणाऱ्या तयार कागदाचा प्रति किलोचा भाव ४५ ते ४६ रुपये
 रद्दी प्रथमच रिसायकल केल्यानंतर साधारणपणे ६० टक्के कागद मिळतो, नंतर त्यात घट होते. 

Web Title: Scrap paper Rate Increase