Video : समुद्रातील गवताळ कुरणांच्या अद्‌भुत जगात

मंगळवार, 30 जून 2020

आपल्याला जमिनीवर दिसणाऱ्या गवताळ प्रदेशांप्रमाणेच समुद्राच्या आतही वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांची कुरणं असतात. त्या वनस्पतींनाही फुलं आणि फळं लागतात. किती तरी जीवांचं अस्तित्व या कुरणांवर अवलंबून असतं. मूळची डोंबिवलीकर असलेली चिन्मया घाणेकर ही तरुणी सध्या तमिळनाडूमधील पाकबे आणि मन्नार परिसरातील सागरी कुरणांवर संशोधन करत आहे.

आपल्याला जमिनीवर दिसणाऱ्या गवताळ प्रदेशांप्रमाणेच समुद्राच्या आतही वेगवेगळ्या प्रकारच्या गवतांची कुरणं असतात. त्या वनस्पतींनाही फुलं आणि फळं लागतात. किती तरी जीवांचं अस्तित्व या कुरणांवर अवलंबून असतं. मूळची डोंबिवलीकर असलेली चिन्मया घाणेकर ही तरुणी सध्या तमिळनाडूमधील पाकबे आणि मन्नार परिसरातील सागरी कुरणांवर संशोधन करत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिन्मया म्हणाली, ‘‘वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या संस्थेतून मी या विषयावर पीएचडी करते आहे. जगात काही देशांमध्ये सागरी गवतांवर अभ्यास केला जातो, मात्र आपल्याकडे हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. स्नोर्केलिंग किंवा स्कूबा डायव्हिंग करून आम्ही अभ्यासक समुद्रातील गवताच्या वेगवेगळ्या प्रकारांचा धांडोळा घेतो. ही कुरणं अनेक प्रकारचे मासे व इतर जिवांचा अधिवास असतात. काही मासे या वनस्पतींपैकी विशिष्ट प्रकारच्या वनस्पती खातात. बरेचसे मासे, त्यांना मोठे मासे खायला आल्यावर या जागांमध्ये लपून बसतात.

काही मासे या गवताळ प्रदेशातील इतर जीवांवर ताव मारतात. काही मासे येथे अंडी देतात. समुद्री गवताच्या ६० प्रजाती जगात आहेत. यांपैकी १५ प्रजाती तमिळनाडूमध्ये आढळतात. समुद्राच्या वरच्या भागात किंवा प्रवाळमय प्रदेशातील मासे मासेमार जाळ्यात पकडतात. गवताळ प्रदेशही त्यांना त्यांच्यासाठी उपयुक्त ठरतो. मासेमारी करणाऱ्यांकडून गवताच्या विभिन्न प्रजातींना धोका पोचू नये; पण मासेमारांची उपजीविकाही थांबू नये, यादृष्टीने प्रयत्न करायची गरज आहे. माझ्या अभ्यासात यावरही भर आहे.’’

पुण्यात कुत्र्यानं गिळला लाखोंचा हिरा अन् पोटातून निघाले 'हे'... 

चिन्मयानं असंही सांगितलं की, या कुरणांचं अस्तित्व धोक्‍यात आलं तर या अधिवासातील काही प्रकारच्या माशांच्या प्रजातीही नष्ट होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. दोन वर्षांच्या अभ्यासातून काही गोष्टी समजल्या. पुढील तीन वर्षांत आणखी जास्त समजतील; पण या अभ्यासात येणारं मोठं आव्हान म्हणजे नैसर्गिक परिस्थितीत सतत होणारे बदल. त्सुनामी तसंच निरनिराळ्या प्रकारच्या वादळांमुळे समुद्रातील परिसंस्था ढवळून निघते. मोठ्या बदलांचा परिणाम अभ्यासावर होतो. अर्थात, अशी बदलणारी परिस्थिती, हाही एक वेगळा अभ्यासविषय ठरू शकतो.