महात्मा फुले शाळेला महापालिकेकडून सील 

संदीप घिसे 
शुक्रवार, 15 जून 2018

पिंपरी (पुणे) : पिंपरी चिंचवडचे प्रस्तावित पोलीस आयुक्तालय चिंचवडच्या प्रेमलोक पार्क येथील महात्मा फुले शाळेत होणार आहे. यामुळे ही शाळा दळवीनगर येथील नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित केली आहे. या स्थलांतराला पालकांचा विरोध असल्याने शाळेला शुक्रवारी महापालिकेकडून सील ठोकण्यात आले आहे.

चिंचवड येथील प्रेमलोक पार्क परिसरात महापालिकेची  महात्मा फुले इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेमध्ये साडेसहाशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ही शाळेची इमारत पिंपरी चिंचवडच्या नवीन पोलिस आयुक्तालय करता देण्याचे निश्चित झाले आहे. यामुळे येथील शाळा जवळच असलेल्या दळवीनगर परिसरात स्थलांतरित केली आहे. मात्र दळवी नगरचा परिसर मुलींसाठी सुरक्षित नाही. तसेच लोहमार्ग जवळ असल्याने विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. यामुळे महात्मा फुले शाळेत वर्ग सुरू ठेवावेत, अशी आग्रही मागणी पालकांची आहे. त्यासाठी पालकांनी विविध मार्गांनी आंदोलनही केले आहे.

शुक्रवारी सकाळी महापालिकेच्या वतीने येथील शाळेला सील ठोकण्यात आले. तसेच शाळा दळवीनगर येथे स्थलांतरित केल्याचा फलकही लावला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. मात्र पालकांनी दुपारी रस्त्यावरच शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

Web Title: Seal by Municipal Corporation to Mahatma Phule School