शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी एनडीएमध्ये झडती 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 जून 2018

पुणे :  खडकवासला येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (नॅशनल डिफेन्स ऍकेडमी - एनडीए)मध्ये शिक्षक भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली. 

पुणे :  खडकवासला येथील लष्करी शिक्षण देणाऱ्या "राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी' (नॅशनल डिफेन्स ऍकेडमी - एनडीए)मध्ये शिक्षक भरती प्रकरणात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बुधवारी सकाळी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी झडती घेऊन कागदपत्रांची तपासणी केली. 

एनडीएमध्ये शिक्षक भरती प्रकरणामध्ये घोटाळा झाला होता. याप्रकरणी सीबीआयने एनडीएचे तत्कालीन प्राचार्य, रसायनशास्त्र आणि गणित विभागातील दोन सहायक प्राध्यापक, राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख अशा पाच जणांवर फौजदारी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करून त्याचा तपासदेखील सुरू केला आहे. त्यासाठी आज सीबीआयच्या एका पथकाने
एनडीएमध्ये जाऊन झडती घेतली. या पदांची भरती करताना या प्राध्यापकांनी बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये या प्रकरणाचीचौकशी सुरू करण्यात आली होती. या प्रकरणात आणखी तपास करण्यासाठी आवश्‍यक कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली. 

तपासणीसाठी सहकार्य 
या झडतीसंदर्भात एनडीएच्या वतीने सीबीआयच्या पथकाकडील कागदपत्रे तपासणी प्रक्रियेसंदर्भातील आदेशांची पाहणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना तपासणीसाठी सहकार्य करण्यात आले. केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून एनडीएच्या शिक्षक पदांसाठी निवड व भरतीप्रक्रिया केली जाते. त्यामुळे संबंधित शिक्षकांनी त्यांच्या निवड व भरतीप्रक्रियेमध्ये बनावट कागदपत्रे
आयोगाला सादर केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात आवश्‍यक ती कारवाई आणि पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे एनडीएतर्फे कळविण्यात आले आहे. 

Web Title: search in the NDA for teacher recruitment scam