'त्या' नवजात अर्भकाचा शोध सुरू...

संदीप घिसे
शनिवार, 14 जुलै 2018

पिंपरी (पुणे) : ठिकाण चाकण, वेळ शुक्रवारी रात्री पावणे नऊ वाजताची, एका महिलेस प्रसूती वेदना होऊ लागल्याने तिच्या पतीने तिला पायी रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. मात्र रस्त्यांमध्येच तिने नाणेकरवाडी पुलाखाली एका बाळाला जन्म दिला. परंतु जन्मानंतर पत्नीची प्रकृती गंभीर झाल्याने अर्भकास तेथेच ठेवून पतीने पत्नीला रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल केले. आता त्या नवजात अर्भकाचा चाकण पोलीस शोध घेत आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कुरळी फाटा येथे राहणाऱ्या एका तीस वर्षीय महिलेस सहा महिन्याची गरोदर असतानाच प्रसुती वेदना होऊ लागल्या. यामुळे तिच्या पतीने तिला चालत रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. ते दोघे नाणेकरवाडी पुलाजवळ येथे आले असता महिलेने बाळाला जन्म दिला. मात्र बाळाच्या जन्मानंतर त्या महिलेची प्रकृती गंभीर झाल्याने पती पुढे प्रश्न निर्माण झाला. बाळाला सोबत घ्यावं की, त्याच्या आईकडे लक्ष द्यावं, अशी द्विधा मनस्थिती त्यांची झाली. यामुळे त्याने बाळाला नाणेकरवाडी पुलाखालीच ठेवून पत्नीला शिक्रापूर रोड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र पत्नीचीही प्रकृती गंभीर असल्याने तिला शुक्रवारी मध्यरात्री वायसीएम रुग्णालयात दाखल केले.

वायसीएम रुग्णालयातील पोलिसांनी चाकण पोलिसांना याबाबत खबर दिली आहे. चाकण पोलीस नाणेकरवाडी ब्रिजखाली आणि आसपासच्या परिसरामध्ये त्या नवजात अर्भकाचा शोध घेत आहेत.

Web Title: search start for that new born baby

टॅग्स