द्वितीय श्रेणीच्या डब्ब्यात पाच सीट वाढणार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 ऑक्टोबर 2016

रेल्वे प्रशासनाचा निर्णय; दक्षिणेकडील गाड्यांत सुरवात
पुणे - उत्पन्नवाढीसाठी रेल्वे प्रशासनाने द्वितीय श्रेणी (सेकंड क्‍लास स्लीपर कोच) वर्गाच्या गाड्यांमध्ये जादा सीट वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यामुळे एका डब्ब्यात 75 प्रवाशांऐवजी ऐंशी प्रवाशांना प्रवास करता येईल. परंतु त्यामुळे डब्ब्यातील गर्दीत वाढ होणार असून, प्रवाशांना अडचण होण्याची शक्‍यता आहे.

द्वितीय श्रेणीच्या रेल्वे गाड्यांमध्ये एका डब्ब्यात समोरासमोर प्रत्येकी तीन सीट आणि त्या समोरील बाजूस दोन सीट अशी सुविधा असते. आशा प्रकारे एक डब्ब्यात 75 प्रवाशांना झोपून प्रवास करण्याची सुविधा (बर्थ) उपलब्ध असते. त्यामध्ये आता बदल करून एका बाजूला तीन सीट, तर दुसऱ्या बाजूला चार सीटची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे एका कंपार्टमेन्टमध्ये आठच्या ऐवजी नऊ प्रवाशांची झोपण्याची सोय होईल. टप्याटप्प्याने रेल्वे प्रशासनाने गाड्यांमध्ये ही सुविधा उपलब्ध करून देण्यास सुरवात केली असून, सध्या दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये ही सुविधा केली असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र रेल्वे प्रशासनाने केलेल्या सुविधेमुळे प्रवाशांची सोय होण्याऐवजी त्रास अधिक होणार आहे. एका बाजूला चार सीट दिल्यानंतर झोपून प्रवास करताना अडचण येणार आहेत, असे रेल्वे क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण एक सीट वाढविल्यानंतर इतर प्रवाशांची जागाही कमी होईल. परिणामी अडचणीत सर्वांना प्रवास करावा लागण्याची शक्‍यता आहे.

तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांच्या काळात असा प्रयोग राबविला होता. मात्र त्यातून अनेक अडचणी समोर आल्या. त्यामुळे तो बंद करण्यात आला.

Web Title: seat increase in second class container