दुसऱ्या दिवशी पायाभूत परीक्षा सुरळीत 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

पिंपरी - पायाभूत चाचणी परीक्षेला मंगळवारी (ता. २८) सुरवात झाली. पहिल्या दिवशीचा गोंधळात पार पडला असताना, दुसऱ्या दिवशी मात्र शाळांना पुरेशा प्रमाणात प्रश्‍नपत्रिका उपलब्ध झाल्या. त्यामुळे गणिताचा पेपर सुरळीत पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

प्रगत महाराष्ट्र अभियानाअंर्तगत ता. २८ ते ३१ ऑगस्टपर्यंत इयत्ता दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वीच विद्यार्थी संख्या जाणून घेतली होती. परंतु, नियोजनाअभावी विद्यार्थ्यांच्या तुलनेत हिंदी, उर्दू आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळेत प्रश्‍नपत्रिका कमी मिळाल्या होत्या. मंगळवारी भाषा विषयाची पायाभूत चाचणी घेण्यात आली होती. त्या वेळीही प्रश्‍नपत्रिका पुरेशा नसल्याने आयत्यावेळी शाळांना धावपळ करावी लागली होती. शहरातील अनेक शाळांमध्ये हेच चित्र दिसून आले. प्रश्‍नपत्रिकांच्या छायांकित प्रती काढण्याची वेळ आली. परिणामी, मुख्याध्यापक व शिक्षकांनी संताप व्यक्त केला. 

Web Title: second day physical examinations well