माध्यमिक शिक्षक राजकुमार वाघ यांचे निधन

प्रा. प्रशांत चवरे
गुरुवार, 12 जुलै 2018

तक्रारवाडी (ता. इंदापुर) येथील माध्यमिक शिक्षक राजकुमार बबन वाघ (वय. ४९) यांचे गुरुवारी (ता. १२) पहाटे ह्रद्यविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले.

भिगवण - तक्रारवाडी (ता. इंदापुर) येथील माध्यमिक शिक्षक राजकुमार बबन वाघ (वय. ४९) यांचे गुरुवारी (ता. १२) पहाटे ह्रद्यविकाराच्या तीव्र धक्याने निधन झाले. वाघ हे भिमथडी शिक्षण संस्थेच्या खानवटे (ता. दौंड) येथील कै. बी. व्ही. राजेभोसले विदयालयांमध्ये माध्यमिक शिक्षक म्हणुन कार्यरत होते. विदयार्थी व पालकप्रिय शिक्षक म्हणुन ते सर्व परिचित होते. ते ग्राहकमंच भिगवण शाखेचे माजी अध्यक्ष होते. सामाजिक कार्यात त्याचा सक्रीय सहभाग होता. तक्रारवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालिका शातांबाई वाघ व कृषी विभागातील कर्मचारी बबन वाघ हे त्याचे आई व वडील होत.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Secondary teacher Rajkumar Wagh passes away