सजिवांच्या पहिल्या हालाचालीचे रहस्य 'आयसर'च्या शास्त्रज्ञांनी उलगडले

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

प्राणी आणि वनस्पती हे दोघेही बहुपेशीय सजीव आहे. असे असतानाही प्राणी जागा बदलू शकतात, वनस्पती नाही. उत्क्रांतीच्या अगदी सुरवातीच्या टप्प्यावर सजींवांमधील ही पहिली हालचाल कशी झाली. याचे कोडे जलीय सूक्ष्मजीव "हायड्रा'च्या अभ्यासातून भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडले आहे.

पुणे - प्राणी आणि वनस्पती हे दोघेही बहुपेशीय सजीव आहे. असे असतानाही प्राणी जागा बदलू शकतात, वनस्पती नाही. उत्क्रांतीच्या अगदी सुरवातीच्या टप्प्यावर सजींवांमधील ही पहिली हालचाल कशी झाली. याचे कोडे जलीय सूक्ष्मजीव "हायड्रा'च्या अभ्यासातून भारतीय शास्त्रज्ञांनी उलगडले आहे. 

पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेचे (आयसर) जीवशास्त्रज्ञ प्रा. संजीव गलांडे आणि भौतिकशास्त्र विभागाचे डॉ. शिवप्रसाद पाटील, डॉ. अप्रतिम चॅटर्जी यांनी इस्राईलमधील प्रा. इरिट सागी यांच्या सहकार्याने हे संशोधन केले आहे. जर्नल ऑफ एक्‍सपिरीमेंटल बायोलॉजी या शोधपत्रिकेत हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. उत्क्रांतीच्या सुरवातीच्या टप्प्यात प्राणी आणि वनस्पतींमधला हालचाली संदर्भातला हा फरक अगदी स्पष्ट नव्हता. सजीवांची पहिली हालचाल उलगडणारा हे संशोधन निश्‍चितच महत्त्वपूर्ण आहे. 

काय आहे हायड्रा? 
ताज्या पाण्याच्या तळ्यात किंवा साठ्यामध्ये आढळणारा सूक्ष्मजीव, ज्याची लांबी 6 ते 10 मिलिमीटर आणि जाडी अर्धा ते एक मिलिमीटर असते. आकाराने गोलाकार असलेल्या हायड्राच्या शरीरावर नांगोड्या आहेत. सुक्ष्मदर्शिकेच्या साहाय्याने याला पहावे लागते. विशेष म्हणजे याचे तुकडे केल्यास तो जिवंत राहतो आणि पुन्हा त्यापासून शरीर तयार करतो. पुन्हा निर्माण होणाऱ्या त्याच्या या गुणधर्मामुळे शास्त्रज्ञांनी त्याची संशोधनासाठी निवड केली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कसे झाले संशोधन? 
- हायड्राच्या उतींची रचना समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञांनी संशोधन सुरू केले. 
- ऍटॉमिक फोर्स मायक्रोस्कोपीचा(एएफएम) या सुक्ष्मदर्शिकेचा वापर 
- उतींचा कडकपना संपूर्ण शरीरात सारखाच नसल्याचे स्पष्ट झाले 
- हायड्राच्या खांद्याजवळील पेशी उर्वरित भागापेक्षा तीन पटीने अधिक ताठर आहे 
- त्याच्या पाठितील ऊतींचा ताठरपणा स्प्रिंग सारखा कार्य करतो 

संशोधनातून काय सिद्ध झाले 
- उत्क्रांतीच्या सुरवातीच्या टप्प्यात हाडे नसताना सजीवांची केलेल्या पहिल्या हालचालीचे रहस्य उलगडले 
- पेशींच्या ताठरपणातूनच पुढे हाडांचा आणि कठीण स्नायूंचा विकास झाल्याचे स्पष्ट 
- पेशींमधील ताठरपणा फक्त 1ः3 प्रमाणात असला तरच हायड्रा स्प्रींगसारख्या कोलांट उड्या मारू शकतो 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ऊतींमधील ताठरपणा असमान पद्धतीने वाढत गेल्यामुळे प्राण्यामध्ये हालण्याच्या क्रियेचा उगम झाला आहे. एक्‍ट्रा सेल्युलर मॅट्रीक्‍स या प्रथीनामुळे उती एकमेकांना घट्ट चिकटतात. त्यातूनच हा ताठरपणा हायड्रामध्ये येतो. 
- प्रा. संजीव गलांडे, जीवशास्त्रज्ञ, आयसर.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: secret of the first movement living beings Animate icar scientists