बावधनला अज्ञातांकडून सुरक्षारक्षकाचा खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

बावधन - बावधन गावच्या हद्दीत कंपनीतील सुरक्षारक्षकाचा काही अज्ञात इसमांनी डोक्‍यात दगड घालून खून केला. मंगळवारी (ता. 12) पहाटे ही घटना उघडकीस आली. जीवनलाल रामसुरीत मुस्तकिल (वय 63, रा. वंडर फ्युचरा येथील लेबर कॅम्प, वारजे माळवाडी, पुणे, मूळ रा. राजापूर, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे.

मुंबई - बंगळूर महामार्गावर चांदणी चौकाजवळ केसीपीएल या कंपनीत जीवनलाल हे सुरक्षारक्षक म्हणून कामाला होते. प्रसन्ना असोसिएट्‌स या खासगी सुरक्षा कंपनीमार्फत त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

सोमवारी (11 जून) रात्री ते कामावर आले होते. मध्यरात्रीनंतर काही अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार करून व डोक्‍यात दगड टाकून त्यांना ठार मारले. त्यानंतर मारेकरी पळून गेले. पहाटे साडेपाचच्या दरम्यान दुसरा सुरक्षारक्षक कामावर आला असताना त्याला जीवनलाल रक्ताच्या थारोळ्यात दिसले.

या प्रकरणी प्रसन्ना असोसिएट्‌सचे व्यवस्थापक सचिन कांतिलाल सोनार यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: security murder crime