पुणे शहर व जिल्ह्यात दुधाच्या दरात किती रुपयांनी वाढ झाली पहा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 जानेवारी 2020

खरेदीदरात चढ-उतार 
विक्रीदराच्या उलट खरेदीदर आहे. खरेदीदर हा कधी जास्त, तर कधी घटला आहे. २०१४ मध्ये गाईच्या दुधाचा खरेदीदर हा प्रतिलिटर २१ ते २५ रुपये होता. २०१५ मध्ये तो २० रुपयांपर्यंत खाली आला. यामुळे विक्रीदराच्या वाढीच्या तुलनेत खरेदीदरात चढ-उतार दिसतो.

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यात गेल्या सात वर्षांत गाईच्या दुधात प्रतिलिटर १२ रुपये, तर म्हशीच्या दुधात १० रुपयांची वाढ झाली आहे. याउलट शेतकऱ्यांकडून खरेदीदरात मात्र केवळ सहा रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकरी उपाशी, तर मध्यस्थ तुपाशी आहेत. परिणामी ग्राहकांनाही भुर्दंड सहन करावा लागत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील सहकारी व खासगी दूध संस्थांनी नुकतीच विक्री दरात पुन्हा वाढ केल्याने गाईचे दूध ४८ रुपये प्रतिलिटर, तर म्हशीचे दूध ५८ रुपये लिटर झाले आहे. शेतकऱ्यांना मात्र दूध संस्थांकडून गाय व म्हशीच्या दुधासाठी अनुक्रमे ३१ रुपये आणि ४२ रुपये प्रतिलिटर दर मिळत आहे. वाहतूक, मार्केटिंग याचा खर्च यात समाविष्ट आहे. मात्र, तफावत मोठी असल्याने ग्राहक भरडले जात आहेत.

विक्री दर चढेच 
दुधाच्या विक्रीदरात २०१४ पासून आजवर एखादा अपवाद वगळता गेल्या सात वर्षांपासून सातत्याने वाढ होत आहे. २०१४ मध्ये गाईचे दूध प्रतिलिटर ३६ रुपये, तर म्हशीचे दूध ४८ रुपये लिटर होते. हाच दर २०१५ मध्ये अनुक्रमे ३८ व ५०, २०१६ मध्ये ४० व ५२ असा होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: See how much the milk price has increased in Pune city and district