पुणे : नायझेरियन नागरिकांकडून साडे चार लाखाचे कोकेन जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

पुणे : शहरात कोकेन हे अंमली पदार्थ विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन नायझेरियन नागरिकांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून 4 लाख 40 हजार रुपयांचे 88 ग्रॅम कोकेन जप्त केले.

केलेची नवाईनी (वय 41 ), कोओई ओकाये (वय 29 , सध्या रा. मुंबई, मुळ रा. नायजेरीया) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. नवाईनी हा बिझनेस व्हिसातर कोआई हा मेडीकल व्हिसावर भारतात आला आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना काही नायझेरियन व्यक्ती कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सहायक पोलिस आयुक्त शिवाजी पवार यांच्या पथकाने बुधवारी (ता.13) दुपारी न्यू पूना क्‍लबच्या आवारात सापळा रचून ही कारवाई केली. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि चार लाख 40 हजारांचे 88 ग्रॅम कोकेन असा पाच लाख 16 हजार ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seize 2.5 lakh cocaine form Nigerian Citizen in pune