दोन पिस्तुलांसह सहा काडतुसे जप्त 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2017

पुणे - सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने वडगाव बुद्रुक परिसरात बुधवारी दुपारी ही कारवाई केली. 

पुणे - सराईत गुन्हेगाराला अटक करून त्याच्याकडून दोन पिस्तुलांसह सहा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या दरोडा प्रतिबंधक पथकाने वडगाव बुद्रुक परिसरात बुधवारी दुपारी ही कारवाई केली. 

मंगेश अरविंद खरे (वय 27, रा. तुकाईनगर, वडगाव बुद्रुक) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. खुनाच्या आरोपातील हा गुन्हेगार वडगाव बुद्रुक परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेतील शैलेश जगताप यांना मिळाली. त्यावरून पोलिस उपायुक्‍त पी. आर. पाटील आणि सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कदम, सहायक उपनिरीक्षक यशवंत आंब्रे, संजय दळवी, शैलेश जगताप यांच्यासह संतोष पागार, नीलेश पाटील, विनायक जोरकर, विनायक पवार, हरिभाऊ रणपिसे, अजय भोसले, परवेझ जमादार, महेश कदम, सचिन गायकवाड, प्रवीण जाधव आदी कर्मचाऱ्यांनी आरोपीला अटक केली. 

आरोपी मंगेश खरे याच्याविरुद्ध सराईत गुन्हेगार बंटी पवार याचा भाऊ चेतन पवारचा एक वर्षापूर्वी खून केल्याचा वेल्हा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बंटी पवार याच्या टोळीकडून त्याच्या जीविताला धोका असल्यामुळे तो पिस्तूल बाळगत होता, असे त्याने पोलिस तपासात सांगितले. 

महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर बेकायदेशीर पिस्तूल आणि घातक हत्यारे बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी दिले आहेत. त्यानुसार गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्‍त सुरेश भोसले यांनी दिली.

Web Title: Seized six cartridges with two pistul