esakal | २०१७ साली सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाकरिता निवड झालेल्यांची अद्यापही नियुक्ती नाही
sakal

बोलून बातमी शोधा

२०१७ साली सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाकरिता निवड झालेल्यांची अद्यापही नियुक्ती नाही

२०१७ साली सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाकरिता निवड झालेल्यांची अद्यापही नियुक्ती नाही

sakal_logo
By
महेश जगताप

स्वारगेट - या पदासाठी चार ते पाच वर्षांतून जाहिरात येते, त्यातूनही नियुक्तीसाठी (Selection) तीन ते चार वर्षे वाट पाहिल्यानंतरही नियुक्ती नाही मिळली तर पुढील जाहिरात येईपर्यंत परीक्षा देण्यासाठीची वयोमर्यादा संपलेली असते. मग आम्ही करायचं काय? कमीत कमी ज्या पदांची तुम्ही जाहिरात काढून निवड केली आहे त्यांची तरी तुम्ही नियुक्ती करा असे मत सकाळशी बोलताना सहायक मोटार वाहन निरीक्षक (Assistant Motor Vehicle Inspector) पदाकरिता प्रतिक्षा यादीतील विद्यार्थी (Student) राजकुमार देशमुख याने मांडले आहे. (Selected for the Post of Assistant Motor Vehicle Inspector in 2017 have not been Appointed Yet)

२०१७ साली एमपीएससीद्वारे सहायक मोटार वाहन निरीक्षक या पदासाठी एकूण ८३३ जागांसाठी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दि. ९ सप्टेंबर २०१९ रोजी लागला. एकूण ८३३ उमेदवारांची शिफारस कागदपत्र पडताळणी नंतर नियुक्ती साठी करण्यात आली. या पदासाठी चार चाकी वाहन चालवण्याचे लायसेन्स असणे बंधनकारक आहे, ते नसल्यामुळे कागदपत्र पडताळणी नंतर अपात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या जास्त होती. त्याचबरोबर जात प्रमाणपत्र नसणे, नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र नसणे, खेळाडू आरक्षणातून निवड झाली असल्यास क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी अहवाल नसणे या कारणांमुळे देखील अनेक विद्यार्थी अपात्र झाले. पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली.

हेही वाचा: ...म्हणून रविंद्र बऱ्हाटेने घेतली नाही कोरोना प्रतिबंधक लस !

त्यामुळे अपात्र झालेल्या विद्यार्थ्यांच्या जागी पहिली प्रतीक्षा यादी १० जुलै २०२० रोजी १०१ जागांसाठी तर दुसरी प्रतीक्षा यादी २८ ऑगस्ट २०२० रोजी ३४ जागांसाठी लागली. म्हणजे एकूण १३५ उमेदवारांची शिफारस या प्रतीक्षा यादींमधून करण्यात आली. परंतु पुन्हा या १३५ मधील अनेक उमेदवार हे कागदपत्र पडताळणी मधून अपात्र ठरले. पात्र उमेदवारांपैकी काही उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली तर काहीजण अजून नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे प्रतीक्षा यादीमधील जे उमेदवार कागदपत्र पडताळणी मधून अपात्र ठरले, कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिले त्यांच्या जागी पुढील प्रतीक्षा यादी अजूनही २०२१ साल आले तरी लावण्यात आलेली नाही. म्हणजेच ८३३ पदांसाठी झालेल्या या परिक्षेतून संपूर्ण ८३३ पदांवर नियुक्ती झाली नाही ती प्रक्रिया पूर्ण होण्याआगोदरच जानेवारी २०२० मध्ये याच पदासाठी दुसरी २४० जागांसाठी जाहिरात आली ज्याची पूर्व परीक्षा देखील १५ मार्च २०२० मध्ये पार पडली. मुख्य परीक्षेची तारीख कोरोना महामारीमुळे अजून जाहीर झालेली नाही.

हेही वाचा: देशातील सर्वात उंच छत्रपती शिवाजी महाराज यांचे शिल्प औरंगाबादमध्ये

या 833 जागा पूर्ण अजूनही भरल्या नाहीत, आणि तरीपण जानेवारी 2020 मध्ये याच पदासाठी नवीन 240 जागांची जाहिरात आली, त्याची पूर्व परीक्षा 15 मार्च 2020 ला झाली आहे.म्हणजे मोटार वाहन विभागाला या जागांची आवश्यकता आहे, नवीन मागणीपत्र काढून नवीन जाहिरात येते, मग आधी झालेल्या परीक्षेच्या संपुर्ण जागा भरण्यास टाळाटाळ का ??

MPSC कागदपत्रे न पाहता, उमेदवारांच्या निकालाची यादी लावते, आणि मग अनेक उमेदवारांकडे त्या पदाच्या पात्रतेची कागदपत्रे नसतात, किंवा काही उमेदवार कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहतात. आशा उमेदवारांच्या जागी ज्यांची कागदपत्रे पूर्ण आहेत, जे कागदपत्रे पडताळणीअंती पात्र ठरू शकतात असे उमेदवार मात्र नियुक्ती पासून वंचित राहतात.

याच पदासाठी खेळाडू आरक्षणामधून खुल्या प्रवर्गाच्या एकूण 22 जागा होत्या. सुरवातीला या 22 जागांसाठी मेरिट नुसार गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली.कागदपत्रे पडताळणी नंतर 22 पैकी 11 उमेदवार नियुक्त झाले आणि 11 बाहेर पडले, म्हणजे 50% उमेदवारांची कागदपत्रे ही वैध नव्हती.पुन्हा त्या 11 जणांच्या जागी दुसऱ्या 11 जणांची प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्या 11 पैकी पुन्हा फक्त 5 उमेदवारांना नियुक्ती मिळाली. 1 उमेदवार गैरहजर राहिला, आणि राहिलेल्या 5 उमेदवारांच्या कागदपत्रांची चौकशी सुरू आहे. त्यातून अजून काही उमेदवार बाहेर पडतील.

मग अशा प्रक्रियेमुळे ज्यांची कागदपत्रे वैध आहेत असे पात्र खेळाडू आजही नियुक्त्यापासून वंचित आहेत !! नियुक्तीची वाट पाहत आहेत !!

- आकाश कांबळे ( प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी)

loading image