निवडक लघुपट पाहण्याची आज संधी!

निवडक लघुपट पाहण्याची आज संधी!

‘सिनेमास्कोप’ महोत्सवात मृणाल कुलकर्णी व उमेश कुलकर्णींना गौरवणार

पुणे - ‘सिनेमास्कोप’ आयोजित लघुपट स्पर्धेची अंतिम फेरी शुक्रवारी (ता. २४) राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात रंगणार आहे. प्राथमिक फेरीतल्या चुरशीच्या स्पर्धेमधून निवडले गेलेले १२ वैविध्यपूर्ण लघुपट विनामूल्य पाहण्याची संधी यानिमित्ताने पुणेकर रसिकांना मिळणार आहे. सांगता सोहळ्यात समर नखाते यांच्या उपस्थितीत मृणाल कुलकर्णी व उमेश कुलकर्णींना ‘प्राइड ऑफ पुणे’ सन्मानाने यानिमित्ताने गौरविण्यात येणार आहे. ‘पॉझी व्ह्यू’च्या सहयोगाने आयोजित या महोत्सवाचे ‘सकाळ’ माध्यम प्रायोजक आहे.

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदुम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने सकाळी साडेअकरा वाजता या महोत्सवास आरंभ होईल. उद्‌घाटन समारंभानंतर याच प्रेक्षागृहात लघुपट दाखवले जातील. या निवडक लघुपटांत स्वप्नांचे पंख 
(दिग्द - पूजा बोगम), प्रायश्‍चित (दिग्द - शिरीश खरात), बलुतं (दिग्द - ज्योती तोरडमल) सावट (दिग्द - ज्योती तोरडमल) वास (दिग्द - अर्जुन मोगरे) व सोनेरी (दिग्द - नीलेश कुंजीर) या मराठी स्पर्धकांचा समावेश आहे. अ मिलियन 
थिंग्ज (दिग्द - वियान विष्णू), कफिंग ग्रॅंड पा (दिग्द - पू शिवप्रकाशन) व कुरुती (दिग्द - जयकुमार सेधुरामन) या दक्षिणेकडच्या कलाकृती आहेत, तर दिल्लीच्या रोचा साहूची ‘बोहेमियन म्युझिशियन’ हा लघुपटही या स्पर्धेत आहे. परदेशातून आलेल्या प्रवेशिकांपैकी स्वान सिंधू मोती या अमेरिकास्थित दिग्दशर्काचा ‘मॉमी’ ही चर्चेत आहे; मात्र नुकत्याच झालेल्या मुंबईच्या काला घोडा महोत्सवात पारितोषिक विजेता, शहानवाज बकल दिग्दर्शित ‘हू डाईज’ हा हिंदी-काश्‍मिरी लघुपट महोत्सवाचे आकर्षण ठरावा.

पूर्ण लांबीच्या चित्रपटांची ताकद ः- संदीप कुलकर्णी
महोत्सवातील लघुपटांचा दर्जा प्रशंसनीय आहे. यातल्या अनेक कृतींमध्ये पूर्ण लांबीच्या चित्रपटांची ताकद आहे. कलाकारांची निवड, वेशभूषा, पार्श्‍वसंगीत आदी त्याच पद्धतीचे जाणवते. दिग्दर्शक विभिन्न भागातले असल्याने विषय व शैलीत वैविध्य आहे. उत्तम आशय व चित्रणातील मेहनत यामुळे यातल्या मराठी स्पर्धकांची कामगिरी आश्‍वासक वाटते...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com