Pune : विद्या प्रतिष्ठान सुपे महाविद्यालयातील 26 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

पिरामल कॅपिटल ही एक बहुराष्ट्रीय फायनान्स आणि सल्लागार क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.
Selection of 26 students of Vidya Pratishthan Supe College for job
Selection of 26 students of Vidya Pratishthan Supe College for jobsakal

बारामती - विद्या प्रतिष्ठान सुपे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्स कंपनीच्या कॅम्पस ड्राईव्हमध्ये महाविद्यालयातील कला, विज्ञान व वाणिज्य शाखेतील अंतिमवर्षातील 26 विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड झाली. पिरामल कॅपिटल ही एक बहुराष्ट्रीय फायनान्स आणि सल्लागार क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.

नुकतेच कंपनीने नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र दिले आहे. आकांक्षा धुमाळ, पायल बोरकर, प्रितम लव्हे, संकेत काळखैरे, रोहित जगताप, अक्षय बोरकर, सौरव कोंडे, धनराज भोंडवे, सोनाली बोरकर, प्रसाद लोखंडे, सूरज चांदगुडे, आरती भरगुडे, शुभम मुळीक, अक्षय इंगळे, सोमनाथ जाधव, तेजस खैरे, शुभम तनपुरे, गौरी केदार, मृणाल चांदगुडे, रेवती डोंबे, नवनाथ शेंडगे, सचिन कुतवळ, प्रणव ठाकूर, विशाखा कुतवळ, प्रसाद सकट, कृष्णात जगताप या विद्यार्थ्यांची पिरामल कॅपिटलमध्ये निवड झाली.

येणाऱ्या काळातही महाविद्यालय कमाल विद्यार्थी रोजगारक्षम बनावेत आणि दर्जेदार नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी अधिकाधिक प्रयत्न केले जातील असा मानस प्राचार्य डॉ. राहुल पाटील यांनी व्यक्त केला. ह्या कॅम्पस ड्राईव्हसाठी पिरामल कॅपिटल आणि हौसिंग फायनान्सचे केयूर शाह व ईश्वरी गिरधर उपस्थित होत्या, विद्या प्रतिष्ठान संस्थेचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी विशाल कोरे, सुपे महाविद्यालयाचे ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी दीपक कुंभार व टीमने यांनी हा कॅम्पस ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त सुनेत्रा पवार, उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक प्रभुणे, सचिव अ‍ॅड. नीलिमा गुजर, खजिनदार युगेंद्र पवार, विश्वस्त डॉ. राजीव शाह, किरण गुजर, मंदार सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंबोज यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com