पंचायत समिती सभापतींच्या निवडी 20 डिसेंबरनंतरच

The selection of the panchayat committee chairmen only after December 20
The selection of the panchayat committee chairmen only after December 20

पुणे : राज्यातील पंचायत समित्यांचे नवे सभापती आणि उपसभापतींच्या निवडी या येत्या 20 डिसेंबरनंतरच होणार असल्याचे ग्रामविकास विभागातील पंचायतराज विभागाचे कक्ष अधिकारी विजय लिटे यांनी सोमवारी (ता.9) सांगितले. 

नवीन वर्षात पुणे जिल्ह्यात राजकीय वातावरण तापणार

 पुणे जिल्ह्यातील पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडीबाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. शिवाय, नियोजित कार्यक्रमानुसार येत्या 13 डिसेंबरला सभापतींच्या निवड केल्या जाणार नाहीत. परिणामी पंचायत समिती पदाधिकाऱ्यांना आपोआपच आणखी एक आठवड्याची मुदतवाढ मिळणार आहे. दरम्यान, नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी होईपर्यंत विद्यमान पदाधिकारीच पदावर कार्यरत राहतील, असेही ग्रामविकास खात्याने स्पष्ट केले आहे.

शस्त्रासह पोलिस अधिक्षकांचा फोटो व्हायरल; कारवाई होणार?

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ अडीच वर्षांचा आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ हा 20 सप्टेंबर 2019 तर, पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापतींचा कार्यकाळ हा 14 सप्टेंबरलाच संपुष्टात आलेला आहे. परंतु राज्य सरकारने या पदाधिकाऱ्यांना चार महिन्यांची मुदतवाढ दिली होती. या मुदतवाढीच्या निर्णयाची अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून चार महिने निवडणूक घेता येणार नसल्याचे सरकारने जाहीर केले होते. त्यानुसार येत्या 20 डिसेंबरला ही चार महिन्यांची मुदतवाढ संपुष्टात येत आहे. त्यानंतरच पंचायत समिती सभापतींच्या निवडी करता येणार असल्याचेही लिटे यांनी स्पष्ट केले आहे.

 पुणे : मार्केटयार्डात किन्नू संत्र्यांचा हंगाम सुरू
 
लवकरच सभापती आरक्षण सोडत
पंचायत समित्यांच्या सभापतींचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठीची सोडत काढण्याचा आदेश जिल्हाधिकारी कार्यालयांना देण्यात आलेला आहे. त्यानुसार संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आपापल्या सोईनुसार येत्या आठवडाभरात या सोडती काढू शकणार आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील सभापतींची आरक्षण सोडत येत्या चार दिवसांत काढली जाणार असल्याचे आज (ता.9) जिल्हाधिकारी कार्यालयातून सांगण्यात आले.
Video : चिंचवडमध्ये बर्निंग कारचा थरार
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com