Vidhansabha 2019 पिंपरीत शिवसेना, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

पिंपरी कॅम्प येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.  यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पिंपरी (पुणे):  पिंपरी कॅम्प येथे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यामध्ये काही जण जखमी झाले आहेत.  यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
माजी उपमहापौर डब्बू आसवांणी यांच्या घरासमोर ही घटना घडली.  सोमवारी (ता. 21) सकाळी आसवांणी यांच्या घरासमोर त्यांचे कार्यकर्ते जमले होते. त्याठिकाणी शिवसेनेचेही कार्यकर्ते असल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर हाणामारीही झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घट्नास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची पिंपरी पोलिस ठाण्यात तक्रार घेतली जात असून कॅम्प परिसरातील परिस्थिती नियत्रणात असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sena, ncp workers clash in pimpri