जुनी सांगवीत पाणी दिनानिमित्त 'पाणी वाचवा..' प्रभात फेरीने जनजागृती

रमेश मोरे
गुरुवार, 22 मार्च 2018

जुनी सांगवी : जागतिक पाणी दिनानिमित्त जुनी सांगवी येथे ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने पाणी बचतीसाठी प्रभात फेरी काढून जनजागृती करण्यात आली. पाण्याची बचत करा, पाण्याचा काटकसरीने वापर करा, गळणारे नळ, दुरूस्त करा, पाणी वाया घालवू नका अशा घोषणा देत काढण्यात आलेल्या या प्रभात फेरीत विद्यार्थी, महिला, नागरीकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

याचबरोबर प्रत्येक प्रमुख चौकांतून पाणी बचतीची व पाण्याच्या काटकसरीची शपथ घेण्यात आली. याचबरोबर प्लास्टिक बंदी कायदा लागू झाला असून त्याची नागरिकांनी अंमलबजावणी करावी, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले.

येथील गजानन महाराज मैदानातून प्रभात फेरीस सुरूवात करण्यात आली. शितोळेनगर, गंगानगर, नृसिंह हायस्कुल, मधुबन या मार्गावरून  ही प्रभात फेरी काढण्यात आली. पाणी बचतीचे नियोजन पत्रके नागरीकांना वाटप करण्यात आली तर घरोघरी भेटी देऊन पाणी बचतीचे भविष्यातील गरजेचे महत्त्व नागरिकांना पटवून दिले.

जुनी सांगवी ज्येष्ठ नागरिक संघ गेली दोन वर्षांपासून सांगवी परिसरात रेन वाँटर हार्वेस्टींग या उपक्रमातून पाणी बचतीचे काम करत आहे. भारतीय दीर्घायू केंद्राकडून संघाच्या कामाचे कौतुक करण्यात आले आहे. यासाठी संघास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला असल्याचे संघाच्या वतीने सांगण्यात आले.

संघाचे अध्यक्ष रविंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या या पाणी वाचवा प्रभात फेरीत अशोक भोसले, मधुकर पाबळकर, विठ्ठल नंदनवार,बंडोपंत शेळके,दत्तात्रय कुलकर्णी,कमलाकर जाधव,जयश्री जंजीरे,वासुदेव मालतुमकर,मोहन माळवदकर,सिताराम लोटणकर,कन्हैया पवार,मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली देशमुख,संग्राम निंबाळकर,कमलताई शेळके,विद्या निंबाळकर,स्वाती कोरळेकर,यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Senior citizen carry out march on the occasion of World water day