Accident : ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच अपघातात ज्येष्ठाचा मृत्यू

मुलाला भेटून घरी परत जात असताना भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरच मृत्यू झाला.
Accident
Accidentsakal

पुणे - मुलाला भेटून घरी परत जात असताना भरधाव वाहनाने धडक दिल्यामुळे एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना १३ मे रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली.

सदाशिव तुकाराम वनशिव (वय ७७ वर्ष, रा. धनकवडी, पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा नातू शुभम वाघमारे (वय २८, रा. हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident
Pune Theft : ‘माझी आई गावी गेली आहे. मला भूक लागली असून, जेवण द्या’, असे म्हणत चोरटयांनी...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदाशिव वनशिव यांच्या मुलावर ससून रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ते मुलाला भेटून परत धनकवडी येथील घरी निघाले होते. ते ससूनच्या प्रवेशद्वाराबाहेर आल्यानंतर भरधाव वाहनाने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्यामुळे सदाशिव वनशिव यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक पसार झाला आहे. पुढील तपास पोलिस अंमलदार सुभाष जगताप करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com