इंदापूरमध्ये वारकऱ्यांना पिठ्ठलं - भाकरीचे वाटप

राजकुमार थोरात
रविवार, 15 जुलै 2018

जंक्शन (ता.इंदापूर) : येथे ज्येष्ठ नागरिक संघांच्या वतीने आनंदनघन, जंक्शनमधील ज्येष्ठ नागरिकांनी भाकरी-उसळीच्या वाटपच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ज्येष्ठांनी घरोघरी जावून भाकरी-भाजी, चपाती गोळा करण्याचे काम केले होते. यामध्ये ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव सुरेश कापडी, अॅड. नरेंद्र शहा, विरेंद्र शहा यांनी सहभाग घेतला. लासुर्णेमध्ये डॉ. योगेश पाटील व डॉ.विजय पिसे यांनी वारकऱ्यांची मोफत तपासणी करुन औषधांचे वाटप केले. 

वालचंदनगर मधील पोस्ट कॉलनीमधील गोल्डन गणेश मंडळाच्या युवकांनी कॉलनीमध्ये भाजी-भाकरी एकत्र करुन जंक्शनमध्ये वारकऱ्यांना वाटपक केले. जंक्शन मध्ये शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख योगेश कणसे, प्रकाश साळुंके यांनी मोफत दुधाचे वाटप केले. लासुर्णेमध्ये वालचंदनगर पत्रकार संघ व सुभाष क्षीरसागर सराफ अॅन्ड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पिठ्ठल-भाकरी-ठेचाचे वाटप करण्यात आले. सुमारे दोन हजार वारकऱ्यांनी पिठ्ठल भाकरी खाण्याचा आस्वाद घेतला.

याचा शुभारंभ वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जी.के.पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाला अभिजित क्षीरसागर, सुमित पारखे, पत्रकार राजकुमार थोरात, धनंजय थोरात, हरीदास वाघमोडे, प्रेमकुमार धर्मार्धिकारी, पोपट मुळीक, प्रदीप तरंगे यांनी मदत केली.

Web Title: senior citizen distribute bread and butter of warkari