सदनिका हडपण्यासाठी ज्येष्ठाशी लग्न !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 एप्रिल 2018

पुणे - सदनिका मिळविण्यासाठी महिलेने घटस्फोटाची बनावट कागदपत्रे बनवून ज्येष्ठ नागरिकाशी लग्न केले. त्यानंतर पतीच्या मदतीने ज्येष्ठ नागरिकास मारहाण करून घर बळकाविण्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सहकारनगर पोलिस ठाण्यात महिलेसह सहा जणांविरुद्ध फिर्याद दाखल  झाली आहे. 

या प्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने ३६ वर्षीय महिलेसह तिचा पती व बनावट कागदपत्रे बनविणाऱ्यांविरुद्ध फिर्याद दिली आहे. निवृत्त प्राध्यापक असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मुलगा परदेशी असल्याने ते पुण्यात किंवा त्यांच्या मूळ गावी एकटेच राहतात. धनकवडी येथे त्यांच्या मालकीची सोसायटी असून, त्यामध्ये त्यांनी भाडेकरू ठेवले आहेत. 

ज्येष्ठ नागरिक व संबंधित महिलेची एका कार्यक्रमात ओळख झाली. ते एकटेच राहत असल्याचे कळल्यानंतर संबंधित महिलेने त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर ओळख वाढवून ज्येष्ठ नागरिकाकडे पतीकडून त्रास होत असून, आपण घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. त्या वेळी महिलेने ज्येष्ठ नागरिकास त्यांच्याशी लग्न करण्याची विचारणा केली. वकिलामार्फत घटस्फोटाची कागदपत्रे बनविण्यात आली. त्यानंतर  दोघांनी लग्न केले. 

आक्षेप घेतल्यानंतर मारहाण
या प्रकारे लग्न झाल्याचे कळल्यानंतर ज्येष्ठ नागरिकास त्यांचे नातेवाईक गावाकडे घेऊन गेले. त्यानंतर तिने पुन्हा पहिल्या पतीसोबत राहण्यास सुरवात केली. पुढे त्यांनी थेट ज्येष्ठ नागरिकाच्या धनकवडी येथील घरामध्येच राहण्यास सुरवात केली. त्यावर ज्येष्ठ नागरिकाने आक्षेप घेतल्यानंतर संबंधित महिलेने व तिच्या पतीने ज्येष्ठ नागरिकास मारहाण केली. या प्रकारामुळे घाबरून ज्येष्ठ नागरिक गावाकडे निघून गेले. नातेवाइकांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये धाव घेऊन महिलेसह तिचा पती व संबंधित प्रकारामध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध फिर्याद दाखल केली.

Web Title: Senior citizen marriage flat grabbing

टॅग्स