पेटीएम अपडेट करण्याची बतावणी करून ज्येष्ठाला पावणेचार लाखांचा गंडा 

पेटीएम अपडेट करण्याची बतावणी करून ज्येष्ठाला पावणेचार लाखांचा गंडा 

पुणे - पेटीएम ऍप अद्ययावत करायचे असल्याचे सांगत सायबर चोरट्यांनी कोथरूड भागातील ज्येष्ठ नागरिकाच्या बॅंक खात्यातून तीन लाख 75 हजार 25 रुपये लांबविल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. 

संबंधित ज्येष्ठाच्या मोबाईलवर गेल्या महिन्यात अज्ञाताने फोन केला. तुमचे पेटीएम ऍप अद्ययावत करायचे आहे. तातडीने माहिती न दिल्यास ऍप बंद पडेल, अशी भीती कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना दाखवली. त्यानंतर फिर्यादी यांना बोलण्यात गुंतवत त्यांच्या बॅंक खात्याची गोपनीय माहिती चोरट्याने मिळविली. त्यानंतर या माहितीचा गैरवापर करून चोरट्याने त्यांच्या बॅंक खात्यातून पैसे काढून घेतले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला. तक्रार अर्जानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण बालवडकर तपास करीत आहेत. 

पेटीएम ऍप अद्ययावत करण्याची बतावणी करून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या सायबर पोलिस ठाण्यात गेल्या दीड महिन्यात 157 तक्रारी दाखल झाल्या आहेत. पेटीएम अपडेट करायचे असून, माहितीसाठी त्वरित नमूद क्रमांकावर संपर्क साधावा, असे मेसेज ऍप वापरत असलेल्यांच्या मोबाईलवर पाठवले जात आहेत. अशा प्रकारच्या संदेशाला प्रतिसाद दिल्यास फसवणूक होण्याची शक्‍यता असून, मोबाईलधारकांनी अशा संदेशांवर विश्वास ठेवू नये. तसेच एनी डेस्क, टीम व्ह्यूवर, क्विक सपोर्ट यासारखे मोबाईल ऍप डाऊनलोड करू नयेत, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com