पन्नाशीत पुन्हा बोहोल्यावर, जेष्ठ नागरीक संघाचा उपक्रम

रमेश मोरे
गुरुवार, 10 मे 2018

जुनी सांगवी - पहिल्यांदा बोहल्यावर चढण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. नव वधु वरांना एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमापासुन, पत्रिका वाटप ते साखरपुडा समारंभ, लग्न समारंभ असे अनेक कार्यक्रम असतात. त्यात पै पाहुण्यांची वर्दळ त्यांची बढदास्त राखण्यासाठी वधु वर पक्षाच्या दोन्ही बाजुंनी केलेला आटापिटा त्यातील आनंदाबरोबरच रूसणं मुरडणं..हे आलंच. तारूण्यात बोहल्यावर चढुन स्वताच्या लग्नाचा अनुभव पुन्हा पन्नाशी नंतर अनुभवण्याचे भाग्य हल्ली दुर्मिळच. मात्र, जुनी सांगवी येथील जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने पुन्हा हा योग पन्नाशी पार केलेल्या जेष्ठांच्या जिवनात आणला.

जुनी सांगवी - पहिल्यांदा बोहल्यावर चढण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. नव वधु वरांना एकमेकांना पाहण्याच्या कार्यक्रमापासुन, पत्रिका वाटप ते साखरपुडा समारंभ, लग्न समारंभ असे अनेक कार्यक्रम असतात. त्यात पै पाहुण्यांची वर्दळ त्यांची बढदास्त राखण्यासाठी वधु वर पक्षाच्या दोन्ही बाजुंनी केलेला आटापिटा त्यातील आनंदाबरोबरच रूसणं मुरडणं..हे आलंच. तारूण्यात बोहल्यावर चढुन स्वताच्या लग्नाचा अनुभव पुन्हा पन्नाशी नंतर अनुभवण्याचे भाग्य हल्ली दुर्मिळच. मात्र, जुनी सांगवी येथील जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने पुन्हा हा योग पन्नाशी पार केलेल्या जेष्ठांच्या जिवनात आणला. वाजंत्री सभा मंडप, व-हाडी, पंडीत, नातेवाईक व पै पाहुण्यांच्या उपस्थितित हा विवाह सोहळा पार पडला.

केशरी फेटे परिधान केलेले दोन्ही पक्षांकडील नातेवाईक स्थानिक मंडळी, मित्रपरिवार या विवाह सोहळ्याला आवर्जुन उपस्थित होते. जुनी सांगवी येथील जेष्ठ नागरीक संघाच्या वतीने, पन्नाशी ओलांडलेल्या श्री व सौ.चंद्रावती व प्रभाकर वानखेडे या जोडप्याचा विवाह सोहळा पन्नाशीनंतर दुस-यांदा थाटामाटात पार पडला. याच बरोबर वयाची पंचाहत्तरी व ऐंशी पार केलेल्या वीस जोडप्यांचा संघाच्या वतीने शाल श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला. 

यावेळी सांगवीतील आजी माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांनी हजेरी लावली. जेष्ठ नगरसेविका माई ढोरे, भाई सोनवणे, दिलिप तनपुरे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी हर्षल ढोरे, शारदा सोनवणे, संतोष,कांबळे, मनोहर ढोरे, प्रशांत शितोळे, सुषमा तनपुरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. तर जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष रविंद्र निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कमलाकर जाधव, बंडोपंत शेळके, दत्तात्रय कुलकर्णी, मोहन माळवदकर, अशोक भोसले, वासुदेव मालतुमकर आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Senior citizen wedding in sanghvi