बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याबाबत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी ठणकावले

balgandhrav.jpg
balgandhrav.jpg

पुणे : "बालगंधर्व रंगमंदिराचा रंगमंच नवीन बांधून नवीन काही करणार असाल तर क्षमा करा. ब्रिटनला जाणाऱ्या माणसाची यात्रा जोपर्यंत शेक्सपियरच्या थिएटरमध्ये जात नाही तोपर्यंत पूर्ण होत नाही. लाल किल्ल्याचा बुरूज ढासळला तर तो उद्धवस्त करून बांधणार का? ताजमहलावर पाणी पडले म्हणून ते पाडणार का ? एखादे थिएटर कसे असावे याचा उत्तम नमुना बालगंधर्वला आहे. देशात त्याला तोड नाही. कोणत्याही सादरीकरणासाठी असे उत्तम उदाहरण सापडणार नाही. ते आहे त्या परिस्थितीत डागडुजी करून आधुनिक पद्धतीने जपलं पाहिजे." अशा स्पष्ट भाषेत ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे यांनी प्रशासनाला ठणकावले.

बालगंधर्व रंगमंदिराचा 52 वा वर्धापन दिनाचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रे, महापौर मुक्ता टिळक, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम आदी उपस्थित होते.

यावेळी महापौर बालगंधर्वच्या पुर्ननिर्माणाबाबत म्हणाल्या, ''बालगंधर्व रंगमंदिराचे मूळ मंदिर पडण्याच्या वल्गनेला अर्थ नाही. ते अद्ययावत करताना कलेला, कलाकाराला धक्का लावणार नाही. सध्या वाहनांची संख्या वाढतीये. जुने मंदिर न पाडता ते सुधारण्याचा विचार करत आहोत. त्याबाबत काही प्रस्ताव असून समिती स्थापन केली आहे. समाजाच्या भावना, आधुनिक दृष्टीकोन सांभाळून ते अद्ययावत केले जाईल.'' त्यावर केेंद्रे यांनी ताशेरे ओढले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com